प्रतिनिधी / बेळगाव
मजगाव, खादरवाडी, पिरनवाडी, हुंचेनहट्टी या चार गावचे ग्रामदैवत मजगाव येथील श्री महालक्ष्मी देवीचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा दि. 30 मार्च ते 8 एप्रिलपर्यंत होणार आहे. यानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
लक्ष्मी गल्ली, मजगाव येथे श्री महालक्ष्मी देवीचे मंदिर आहे. श्री महालक्ष्मी देवीची मूर्ती भग्न झाल्याने ती ग्रामस्थांच्यावतीने दुरुस्ती करून प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन चार गावांमार्फत करण्यात आले आहे.
मंगळवार दि. 30 रोजी वार पाळणूक करून गाऱहाणे घालणे. शुक्रवारी गाऱहाणे घालून वार सोडणे कार्यक्रम होईल. रविवार दि. 4 रोजी रात्री 12 नंतर श्री लक्ष्मी देवीची मूर्ती गाभाऱयात बसविण्यात येईल. दि. 5 रोजी पहाटे सूर्योदयावेळी 6 वा. 31 मि. नेर काढणे व अक्षतारोपण कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर अभिषेक, नैवेद्य व धार्मिक विधी होणार आहेत. दि. 6 रोजी धार्मिक कार्यक्रम होणार आहे. 7 रोजी सकाळी 7 पासून भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले करून मानकऱयांच्या ओटय़ा, त्यानंतर ग्रामस्थांच्या ओटय़ा स्वीकारण्याचा कार्यक्रम सुरू होईल. गुरुवार दि. 8 रोजी खादरवाडी, पिरनवाडी, हुंचेनट्टी व उपनगरातील भाविकांसाठी ओटी स्वीकारण्याचा कार्यक्रम होईल. रात्री 11.30 वाजता भंडारा उधळण्याचा कार्यक्रम होणार आहे. सदर यात्रोत्सवावेळी कोरोना नियंत्रणासाठी शासनाचे सर्व नियम पाळून यात्रोत्सव देवस्थान कमिटीमार्फत यात्रा पार पाडण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.