वार्ताहर/ मजगाव
मजगाव येथे डेंग्यूचे शेकडो रुग्ण उपचार घेत असल्याने मजगावचे ग्रामस्थ सोमवार दि. 18 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्र येऊन डेंग्यू निर्मूलनासाठी निवेदन जिल्हाधिऱयांना देण्यात येणार आहेत. यावेळी मजगावातील सर्व वकील, माजी नगरसेवक, उद्योजक, ग्रामस्थ, <युवक मंडळाचे पदाधिकारी व युवक सहभागी होणार आहेत.
गेल्या चार महिन्यापासून मजगावात डेंग्यूचा संसर्ग आहे. यामुळे येथील दोन महिलांचा मृत्यूही झाला आहे. तरीदेखील प्रशासनाने ठोस असा कोणताच स्वच्छतेसाठी कार्यक्रम राबवला नसल्याने परिसरामध्ये डासांचा प्रादुर्भाव वाढल्यानेच आजदेखील मजगावातील सुमारे 100 हून अधिक नागरिक खासगी रुग्णालयातून उपचार घेत आहेत.