प्रतिनिधी / बेळगाव
मजगाव येथील कृषी पत्तीन सहकारी संघाची वार्षिक सभा गुरुवार दि. 24 रोजी दुपारी संघाच्या नूतन सभागृहात आयोजित करण्यात आली होती. बैठकीच्या अध्यक्षस्थानी चेअरमन शिवाजी पट्टण हे होते.
यावेळी सावंत बाळाप्पा पुजारी सुरेश धर्मु सुप्पण्णावर, श्रीपाल देवाप्पा सातगौडा, नागाप्पा देवाप्पा सातेरी, अल्लाबक्ष किल्लेकर, अशोक पुजार, राजू सातेरी, लक्ष्मण बळगण्णावर, पांडु गिड्डण्णावर, सन्नमल्लाप्पा तळवार, शारदा कालीबाग, सरोजिनी बस्तवाड, बापू सातगौडा, अशोक नरसगौडा, भरत धुळाई, सुरेश मजुकर आदी मान्यवर उपस्थित होते.
उपस्थितांचे स्वागत व परिचय बापू सातगौडा यांनी केले. यावेळी सुरुवातीला दीपप्रज्वलन प्रमुख पाहुणे सावंत बाळाप्पा पुजारी यांच्या हस्ते झाले.
यावेळी सेक्रेटरी बी. डी. मारिहाळ यांनी अहवाल वाचन केले. यानंतर साधक बाधक चर्चा होऊन सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे चेअरमन शिवाजी पट्टण यांनी दिली. यावेळी आर्थिक वर्षात संघाला 6 लाख 37 हजार रुपये नफा झाल्याचे जाहीर केले. सभसदांसाठी 16 टक्के डिव्हिडंड वितरीत करण्याचे जाहीर केले.
सदर संचालक मंडळाने आर्थिक वर्षात संघाच्या इमारतीवर सुसज्ज असे सभागृह बांधले आहे. त्याबद्दल त्यांचे विशेष कौतूक करण्यात आले.
संचालक मंडळ, कर्मचारी वर्गाने या आर्थिक वर्षात अनावश्यक खर्चाला फाटा देऊन संस्थेच्या प्रगतीला हातभार लावल्याने उपस्थित मान्यवरांनी कौतूक केले. यावेळी नागाप्पा सातेरी, नंदकुमार मजुकर आदींनी विचार मांडले. सूत्रसंचालन बापू सातगौडा यांनी केले. आभार प्रदर्शन बी. डी. मारीहाळ यांनी केले.