वार्ताहर /किणये
मजगाव येथील नूतनीकरण केलेल्या ब्रह्मलिंग समुदाय भवनाचे शुक्रवारी थाटात उद्घाटन करण्यात आले. यानिमित्त विविध धार्मिक व अध्यात्मिक कार्यक्रम झाले. भाविकांसाठी तीर्थप्रसादाचे आयोजन केले होते.
मजगाव येथील ब्रह्मलिंग समुदाय भवनासाठी नव्याने तीन हॉल बांधले आहेत. तसेच स्वयंपाक खोली व नवीन कूपनलिकेची खोदाई करण्यात आली. या समुदाय भवनाचे आकर्षक असे नूतनीकरण करण्यात आले असल्याने मजगावसह पंचक्रोशीतील नागरिकांना याचा लाभ होणार आहे.
उद्घाटन सोहळय़ाच्या प्रारंभी ब्रह्मलिंग व कलमेश्वर मूर्तीचे पूजन विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते फीत कापून समुदाय भवनाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी कलमेश्वर पब्लिक ट्रस्ट कमिटीचे अध्यक्ष बहुबली कुडची, उपाध्यक्ष शिवाजी पट्टण, राजन मजुकर, सुरेंद्र गौरण्णा, तातोबा सुतार, माणिक पाटल, अशोक पुजारी, सावंत पुजारी, राजू सातेरी, आदींसह ब्रह्मलिंग जीर्णोद्धार कमिटीचे अध्यक्ष एकनाथ चौगुले, सचिन वाडेकर, नारायण शहापूरकर, बापू भडांगे, मधू पुजारी, ग्रामस्थ उपस्थित होते. पौरोहित्य शितल उपाध्ये व त्यांच्या सहकाऱयांनी केले. रात्री भजनाचा कार्यक्रम झाला.