उद्यमबाग पोलीस स्थानकात एफआयआर
प्रतिनिधी / बेळगाव
मजगाव येथील एक वृध्दा गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता झाली आहे. यासंबंधी तिच्या मुलाने उद्यमबाग पोलीस स्थानकात फिर्याद दिली असून पोलीस त्या वृध्द महिलेचा शोध घेत आहेत.
सरोजनी मधुकर शिंदे (वय 60, रा. मजगाव) असे त्या महिलेचे नाव आहे. दि. 26 ऑक्टोबर रोजी सकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास ही महिला आपल्या घराबाहेर पडली होती. ती अद्याप घरी परतली नाही. मुलाने उद्यमबाग पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे.
5.4 फूट उंची, अंगाने साधारण, गोल चेहरा, गहू वर्ण, लांब नाक असे त्या वृध्देचे वर्णन आहे. सरोजनी या कन्नड, मराठी बोलतात. घराबाहेर पडताना निळय़ा रंगाचा गाऊन व स्वेटर परिधान केला आहे. वरील वर्णनाच्या वृध्दे विषयी कोणाला माहिती असल्यास 0831-2405238 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.