प्रतिनिधी/ बेळगाव
महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर शनिवारी मजगाव परिसरात पोलिसांचे पथसंचलन झाले. पोलीस बॅन्डची या पथसंचलनासाठी साथ मिळाली.
उद्यमबाग पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रातील ब्रम्हनगर, ब्रम्हदेव मंदिरापासून पथसंचलनाला प्रारंभ झाला. तेथून ब्रम्हनगर पहिला व दुसरा क्रॉस, रायण्णानगर, चन्नम्मासर्कल, गजानननगर, कलमेश्वर नगर, आंबेडकर गल्ली, महावीर मेडीकल्स, पूजार गल्ली, गंगाई गल्ली, लक्ष्मी गल्ली, पाटील गल्ली, मारुती गल्ली, तानाजी गल्ली, मुस्लिम गल्ली, वाल्मिकी गल्ली, गणपती गल्लीमार्गे चन्नम्मा सर्कलला येवून पथसंचलनाची सांगता झाली.