शहापूर, टिळकवाडी पोलिसांची कारवाई, 25 हजार रुपये जप्त
प्रतिनिधी /बेळगाव
शहापूर व टिळकवाडी पोलिसांनी मटका अड्डय़ांवर छापे टाकुन सहा जणांना अटक केली आहे. त्यांच्या जवळून 25 हजार 270 रुपये रोख रक्कम व मटक्मयाच्या चिठ्ठय़ा जप्त करण्यात आल्या आहेत. पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांनी ही माहिती दिली आहे.
शहापूरचे पोलीस निरीक्षक राघवेंद्र हवालदार व त्यांच्या सहकाऱ्यांनी वडगाव येथे मटका घेणाऱ्या तिघा जणांना अटक करुन त्यांच्या जवळून 17 हजार 70 रुपये जप्त केले आहेत. बाबु शिवाजी जाधव (वय 68, रा. कारभार गल्ली), विनायक मारुती बिर्जे (वय 26, रा. मंगाईनगर, वडगाव), अब्दुल रेहमत्तुला सेठ (वय 30, रा. धामणे रोड) अशी अटक करण्यात आलेल्या त्रिकुटांची नावे आहेत. त्या सर्व तिघा जणांवर शहापूर पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
दुसरी कारवाई टिळकवाडी पोलिसांनी केली आहे. मंडोळी रोडवरील शांतीनगर-गणेश मंदिरानजीक मटका घेणाऱया तिघा जणांना अटक करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक विनायक बडीगेर व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली आहे. ऍन्थोनी व्हिक्टर मेंडोन्सा (वय 21, रा. भवानीनगर, मंडोळी रोड), संतोष शट्टय़ाप्पा राठोड (वय 28, मुळचा रा. बन्नूर तांडा, सध्या रा. चन्नम्मानगर), सुनील शर्मा (वय 30, रा. सह्याद्रीकॉलनी, भवानीनगर) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्या जवळून 8 हजार 200 रुपये रोख रक्कम व केए 22 एमएच 2350 क्रमांकाची मोटार सायकल जप्त करण्यात आली आहे.