13 जणांविरुद्ध एफआयआर, 60 हजार रुपये जप्त, खंजर गल्लीतील शेड हटविले
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव शहर व तालुक्मयातील मटका अड्डय़ांवरील कारवाई तीव्र करण्यात आली आहे. गेल्या 24 तासांत पाच ठिकाणी छापे टाकण्यात आले असून 13 जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. तर पोलिसांनी 60 हजार रुपये रोकड जप्त केली आहे. खंजर गल्ली येथे मटकाबुकींनी उभारलेले पत्र्याचे शेड पोलिसांनी दुसऱयांदा पाडले आहे.
पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांनी ही माहिती दिली आहे. गेल्या 24 तासांत मारिहाळ, खडेबाजार, मार्केट व सीसीआयबीच्या अधिकाऱयांनी मटका अड्डय़ांवर छापे टाकले आहेत. पोलिसांच्या या मोहिमेने मटका व जुगारी अड्डा चालकांचे धाबे दणाणले आहेत.
मंगळवारी सायंकाळी बाळेकुंद्री खुर्द येथील एका मटका अड्डय़ावर छापा टाकून तिघा जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याजवळून 42 हजार 90 रुपये रोख रक्कम व तीन मोबाईल संच, मटक्मयाच्या चिठ्ठय़ा जप्त करण्यात आल्या. तर खडेबाजार पोलिसांनी कचेरी रोडवर मटका घेणाऱया एका बुकीला अटक करून 2 हजार 990 रुपये रोख रक्कम व चिठ्ठय़ा जप्त केल्या.
मार्केट पोलिसांनी खंजर गल्ली येथे दोघा मटकाबुकींना बुधवारी अटक केली. त्यांच्याजवळून 1 हजार 275 रुपये रोख रक्कम, एक मोबाईल संच जप्त केला. तर सीसीआयबीच्या अधिकाऱयांनी उद्यमबाग झोपडपट्टीजवळ चौघा जणांना ताब्यात घेऊन 9 हजार 890 रुपये रोख रक्कम ताब्यात घेतली.
मारिहाळ पोलिसांनी सुळेभावी येथील मटका अड्डय़ावर छापा टाकून एका बुकीला अटक केली. त्याच्याजवळून 2 हजार 920 रुपये रोख रक्कम व मटक्मयाच्या चिठ्ठय़ा जप्त केल्या. संबंधितांविरुद्ध कर्नाटक पोलीस कायद्यांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आले आहेत.
पत्र्याचे शेड दुसऱयांदा हटविले खंजर गल्ली परिसरात मटकाबुकींनी उभारलेले पत्र्याचे शेड मार्केट पोलिसांनी दुसऱयांदा हटविले आहे. यापूर्वी स्वतः पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांनी या अड्डय़ावर छापा टाकून शेड हटविले होते. त्यानंतर काही महिन्यांनी मटकाबुकींनी त्याच परिसरात पुन्हा शेड उभारून मटका व्यवसाय थाटला होता. मार्केटचे पोलीस निरीक्षक मल्लिकार्जुन तुळसीगेरी व त्यांच्या सहकाऱयांनी ते शेड पुन्हा हटविले आहे. पोलिसांनी दोन ऑटोरिक्षाही जप्त केल्या आहेत.