खंजर गल्ली येथे मार्केट पोलिसांची कारवाई
प्रतिनिधी / बेळगाव
खंजर गल्ली येथे मटका घेत असल्याची माहिती मार्केट पोलिसांना मिळाली. त्यानंतर त्या ठिकाणी अचानक धाड घालून 21 जणांना अटक केली व त्यांच्याकडील 10 हजार 615 आणि 13 मोबाईल संच जप्त करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे मटकाबुकींमध्ये धडकी भरली आहे.
मार्केट पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली आहे. महम्मदशफी मोदीसाब तहसीलदार (वय 58, रा. खंजर गल्ली), नूरअहम्मद अम्मनसाब बागवान (वय 64, रा. अनगोळ), श्रीकांत वेंकटेश अध्यापक (वय 52, रा. महांतेशनगर, बेळगाव), खादर इस्माईल शेख (वय 28, रा. वैभवनगर), सहदेव बाबुराव सुतार (वय 51, रा. ऑटोनगर), आनंद वैजु पाटील (वय 51, रा. बी. के. कंग्राळी), भरमा बाबु गरड (वय 30, रा. वंटमुरी), प्रकाश दत्ताराम पाटील (वय 25, रा. अष्टे-चंदगड), शट्टय़ाप्पा यल्लाप्पा नाईक (वय 54, रा. यरगट्टी), सुनील महादेव सुतार (वय 50, रा. शिवाजीनगर), कृष्णा पुन्नाप्पा गाडीवड्डर (वय 46, रा. रामनगर), मेहबुब दस्तगीर मस्केवाले (वय 58, रा. बाळेकुंद्री), शंकर तम्मान्ना गाडीवड्डर (वय 48, रा. रामनगर), राजू केशव पत्ते (वय 40, रा. अथणी), शिवाजी मारुती बैलसत्तार (वय 35, रा. वंटमुरी), सुनील बाबुराव परीट (वय 45, रा. कंग्राळ गल्ली, बेळगाव), कल्लाप्पा गोविंद पुजारी (वय 52, रा. आंबेवाडी), रुद्राप्पा दुंडाप्पा बेटगेरी (वय 45, रा. एम. के. हुबळी), यासीन कासीमसाब शिंदू (वय 60, रा. शहापूर, बेळगाव), वासीम राजासाब गोडसेवाले (वय 41, रा. कंग्राळ गल्ली), सलीम अहम्मद मुल्ला (वय 49, रा. खंजर गल्ली) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
मार्केट पोलिसांनी ही कारवाई केली असून मटका बुकींच्या विरोधात धडक मोहीम राबविण्यास सुरूवात केली आहे. 10 हजार 615 रुपये आणि मटक्मयाच्या चिठ्ठय़ा त्यांच्याकडून जप्त केल्या आहेत.