चार ठिकाणी कारवाई, सहा जणांना अटक
प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव ग्रामीण व उद्यमबाग पोलिसांनी मटका व गावठी दारू अड्डय़ांवर छापे टाकून सहा जणांना अटक केली आहे. शनिवारी ही कारवाई करण्यात आली असून एकूण चार ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत, अशी माहिती पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन यांनी एका पत्रकाद्वारे दिली आहे.
उद्यमबागचे पोलीस निरीक्षक दयानंद शेगुणशी व त्यांच्या सहकाऱयांनी राजू लोहार (वय 41, रा. महावीर गल्ली, उद्यमबाग), जोतिबा माणगावकर (वय 26, रा. मजगाव) या दोघा मटकाबुकींना अटक करून त्यांच्या जवळून 4 हजार 310 रुपये रोख रक्कम व मटक्मयाच्या चिठ्ठय़ा जप्त केल्या आहेत.
शुक्रवारी सायंकाळी बेळगाव ग्रामीणचे पोलीस निरीक्षक सुनीलकुमार नंदेश्वर व त्यांच्या सहकाऱयांनी येळ्ळूर येथे मटका घेणाऱया मयूर कदम (वय 26, रा. कलमेश्वर गल्ली, येळ्ळूर) याला अटक करून त्याच्या जवळून 5 हजार 250 रुपये रोख रक्कम जप्त केली आहे. बेनकनहळ्ळी येथील बसथांब्याजवळ मटका घेणारे नागेश देसूरकर (वय 35), श्रीकांत बेनके (वय 38, दोघेही रा. बेनकनहळ्ळी) यांना अटक करून 4 हजार 750 रुपये जप्त करण्यात आले आहेत.
उद्यमबाग पोलिसांनी खानापूर रोडवरील विश्वा सिरॅमिकजवळ गावठी दारू विकणाऱया संतोष पाटील (वय 34, रा. ब्रह्मनगर, उद्यमबाग) याला अटक करून त्याच्या जवळून 17 लीटर गावठी दारू जप्त केली आहे. पोलीस निरीक्षक दयानंद शेगुणशी व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली असून कर्नाटक कायद्यांतर्गत त्यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला आहे.