26 हजार रुपये , दोन दुचाकी, सात मोबाईल जप्त
प्रतिनिधी /बेळगाव
क्रांतीनगर येथे मटका घेण्यात येत असल्याची माहिती कॅम्प पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांच्या मार्गदर्शनाखाली कॅम्प पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक प्रभाकर एस. धर्मट्टी आणि त्यांच्या सहकाऱयांनी धाड टाकून मटका घेणाऱया सात जणांना अटक केली. त्यांच्याकडील रोख 26 हजार रुपये, दोन दुचाकी आणि सात मोबाईल देखील जप्त करण्यात आले आहे.
क्रांतीनगर परिसरात मटक्मयाचा सुळसुळाट वाढला होता. पोलिसांनी त्यावर नजर ठेवली होती. त्यानंतर सापळा रचून या सात जणांना ताब्यात घेऊन रक्कम व ऐवज जप्त केला आहे. या धाडीमध्ये पोलीस हवालदार बी. बी. गौडर, पोलीस कॉन्स्टेबल एस. बी. बरगी, डी. एल. सरवी, जी. ए. ज्योती, के. एस. मुक्कण्णावर, आर. बी. निपनाळ यांनी सहभाग घेतला होता. मटका घेणाऱयांविरोधात आता पोलीस प्रशासनाने मोहीम तीव्र केली आहे.