पोलिसांच्या धडक कारवाईने मटकाबुकींचे धाबे दणाणले : विनायकनगर आणि मारिहाळ येथे कारवाई
प्रतिनिधी / बेळगाव
मटका आणि जुगारी अड्डय़ांवर पोलिसांनी गेल्या काही दिवसांपासून धडक कारवाईला सुरुवात केली आहे. या कारवाईमुळे मटकाबुकी आणि जुगारी अड्डे चालकांचे धाबे दणाणले आहेत. मंगळवारी विनायकनगर व मारिहाळ येथे धाडी टाकुन सीसीबी व मारिहाळ पोलिसांनी तिघा जणांना अटक केली. त्यांच्याकडून 1 लाख 22 हजार 760 रुपये आणि मोबाईल जप्त केले आहेत.
विनायकनगर येथे सीसीआयबी पोलिसांनी धाड टाकून वैभव न्हावी (वय 34, रा. विनायकनगर) आणि बाबाजी पावशे (वय 34, रा. उचगाव) यांना अटक केली. त्याच्याकडून 1 लाख 11 हजार 360 रुपये रोख, दोन मोबाईल व मटक्मयाच्या चिठ्ठय़ा जप्त केल्या आहेत.
विनायकनगर येथे मटका घेण्यात येत असल्याची माहिती मिळातच पोलिसांनी अचानक धाड टाकून दोघांना अटक केली. या कारवाईत सीसीआयबीचे पोलीस निरीक्षक संजू कांबळे व ए. के. कांबळे, बी. एन. बळबण्णावर, एस. सी. कोरे, एस. एल. पाटील, सी. टी. चन्नाप्पगोळ भाग घेतला होता. या कारवाईमुळे मटका घेणाऱयांमध्ये एकच खळबळ माजली आहे.
विनायकनगर आणि परिसरामध्ये मोठय़ा प्रमाणात मटका घेण्याचे काम सुरु होते. बऱयाच वर्षांपासून मटकाबुकी वावरत होते. त्यामुळे अनेक जण या मटक्मयाच्या आहारी गेले आहेत. याबाबत या परिसरातील नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली होती. मंगळवारी मटका घेतानाच ही धाड टाकण्यात आली. उचगावमधील एकाला अटक करण्यात आल्याने उचगावमध्येही मटकाचा सुळसुळाट सुरु असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे आता उचगाव परिसरातही मटका घेणाऱया मटकाबुकीवर पोलीस लक्ष ठेवून आहेत. लवकरच त्यांच्यावरही कारवाई होण्याची शक्मयता व्यक्त होत आहे.
सीसीआयबीचे पोलीस निरीक्षक संजू कांबळे यांनी ही कारवाई केली. बऱयाच दिवसानंतर ही मोठी कारवाई असून मटकाबुकींकडून इतकी रक्कम जप्त करण्यात आली. त्यामुळे वरिष्ठ पोलीस अधिकाऱयांनी संजू कांबळे यांच्यासह या कारवाईमध्ये भाग घेतलेल्या सर्वांचे कौतुक केले आहे. कॅम्प पोलीस स्थानकात या घटनेची नोंद करण्यात आली आहे.
मारिहाळ पोलिसांनीही एका मटकाबुकीला अटक केली आहे. मारिहाळ येथे फकिराप्पा गुडदप्पा बळ्ळोडी (वय 23, रा. मारिहाळ) हा मटका घेत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलीस निरीक्षक बी. एस. मंटूर यांच्या नेतृत्वाखाली धाड टाकून त्याच्याकडून 10 हजार 400 रुपये आणि मटक्मयाच्या चिठ्ठय़ा जप्त केल्या आहेत.