समस्या सोडविण्याकडे महापालिकेच्या अधिकाऱयांचे दुर्लक्ष : नागरिकांतून नाराजी
प्रतिनिधी / बेळगाव
महापालिकेच्यावतीने शहरात विविध विकासकामे राबविण्यात येत आहेत. मात्र, काही ठिकाणी नागरिकांच्या समस्या सोडविण्याकडे महापालिका प्रशासनाच्या अधिकाऱयांनी दुर्लक्ष केले आहे. मठ गल्ली परिसरात ड्रेनेज चेंबरचे झाकण खराब झाले असल्याने चेंबर उघडय़ावर आहे. परिसरातील रहिवाशांना आणि व्यावसायिकांना धोकादायक बनले असल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
विकासकामे राबविण्यात येत असल्याचे सांगून कोटय़वधी निधीचा चुराडा केला जात आहे. मात्र, सर्वसामान्य नागरिकांना आवश्यक असलेल्या नागरी सुविधा पुरविण्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. परिणामी नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. मठ गल्ली परिसरात उघडय़ावर असलेल्या ड्रेनेज चेंबरबाबत अनेक वेळा तक्रारी करण्यात आल्या. मात्र, याची दखल घेण्यात आली नाही. परिणामी ड्रेनेज नागरिकांना धोकादायक बनले आहे. शहराच्या बाजारपेठेचा भाग म्हणून ओळखल्या जाणाऱया मठ गल्लीतील चेंबरचे झाकण खराब झाले आहे. त्याचप्रमाणे ड्रेनेज चेंबर मोडकळीस आले आहे. यामुळे येथील रहिवाशांनी महापालिकेच्या अधिकाऱयांकडे तक्रार केली असता दखल घेण्यात आली नाही. वारंवार तक्रार करूनही याकडे महापालिकेच्या अधिकाऱयांनी कानाडोळा केला असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. शहराच्या बाजारपेठेचा भाग असून सध्या लॉकडाऊन असल्याने ठिकठिकाणी बॅरिकेड्स लावून रस्ता बंद करण्यात आला आहे. त्यामुळे व्यावसायिक खुल्या रस्त्यांचा वापर करीत आहेत. पण चेंबरवर झाकण नसल्याने वाहनधारकांना ये-जा करताना अडचण निर्माण होत आहे. यामुळे ड्रेनेज चेंबरवर झाकण घालून कोसळलेल्या ठिकाणी बांधकाम करण्यात यावे, अशी मागणी होत आहे.