स्वतःच्या 14 वर्षीय मुलीचाच खून केल्याचे प्रकरण
प्रतिनिधी / पणजी
चौदा वर्षाच्या आपल्याच मुलीचा खून केल्याचा आरोप असलेल्या गोकूळवाडी साखळी येथील सुनिल कुमार रंजन (46) याचा जामीन अर्ज उत्तर गोव्याच्या अतिरिक्त सत्र न्यायाधीश दुर्गा मडकईकर यांच्या न्यायालयाने फेटाळला.
आपल्या वडिलांना जामिनावर सोडण्यात यावे यासाठी आरोपीची दुसरी मुलगी प्रतिभा रंजन (22) हिने आपल्&ंया वडिलांच्यावतीने न्यायालयात अर्ज केला होता. सरकारी वकील सी. सीमोईस यांनी डिचोली पोलिसांच्यावतीने न्यायालयात काम पाहिले.
विवाहीत इसमाकडे असलेल्या मैत्रिच्या संबंधामुळे आरोपी आपल्या 14 वर्षीय मुलीला सुधारण्याचा प्रयत्न करीत होता. शेजारचा विवाहीत पुरुष या 14 वर्षीय मुलीचे जीवन बरबाद करणार अशा अनेक तक्रारी आरोपीच्या कानी आल्या होत्या असे आरोपीच्यावतीने न्यायालयात सादर केलेल्या कागदपत्रात म्हटलेले आहे.
खुनाची ही घटना 1 ऑक्टोबर 2020 रोजी रात्री 8.30 वाजण्याच्या सुमाराला घडली होती. आरोपीचे दोन्ही मुलगे या घटनेचे साक्षीदार आहेत. क्रिकेट स्टॅम्पने आरोपीने आपल्या मुलीला मारहाण केली होती. त्यानंतर आरोपीनेच मोटारीने या जखमी मुलीला घेऊन एका खासगी इस्पितळात नेले होते. त्यानंतर तिला डिचोली येथील एका इस्पितळात नेण्यात आले. मात्र डिचोलीतील त्या इस्पितळातील कर्मचाऱयांनी जखमी मुलीला पाहून ही पोलीस केस असलयाचे सांगून या मुलीवर उपचार करण्यास नकार दिला होता असेही आरोपीच्यावतीने न्यायालयात सादर केलेल्या कागदपत्रात मटलेले आहे.
मयत मुलीला मारहाण करण्याचा आरोपीचा हेतू नव्हता तर विवाहीत इसमाच्या कृत्याला बळी पडू नये म्हणून आरोपीने थोडीफार मारहाण केली होती असे आरोपीच्यावतीने न्यायालयात युक्तिवाद करण्यात आला.
दिनेश कुमावतच्या जीवाला धोका
पोलिसांच्यावतीने न्यायालयात युक्तिवाद करताना या प्रकरणी अनेक साक्षीदारांच्या जबान्या नोंद करायच्या आहेत. तपास सध्या चालू आहे. या खून प्रकरणी हर एक पुरावा गोळा करण्यासाठी आरोपी पोलिसाना हवा आहे. या क्षणी आरोपीला जामिनावर सोडल्यास मूळ उत्तर प्रदेशातील हा आरोपी फरारी होण्याची शक्यता आहे. आरोपीला जामिनावर सोडल्यास 14 वर्षीय मुलीकडे संबंध ठेवलेल्या दिनेश कुमावत याच्या जिवालाही धोका आहे असे पोलिसांच्यावतीने न्यायालयाच्या निदर्शनाला आणून देण्यात आले आणि या कारणास्तव आरोपीला जामिनावर सोडू नये अशी विनंती करण्यात आली. न्या.मडकईकरयांच्या न्यायालयाने दोन्हीपक्षांचा युक्तिवाद ऐकून घेतला आणि पोलिसांनी व्यक्तकेलेल्या आशंकाखऱया होण्याची शक्यता व्यक्त करुन आपल्या 14 वर्षीय मुलीचा खून केल्याचा आरोप असलेल्या गोकूळवाडी येथील सुनिलकुमार रंजन याला जामिनावर सोडण्यास नकारदिला.