प्रतिनिधी / मडगाव
पाजीफोंड-मडगाव येथील जुन्ता क्वॉर्टरमध्ये रविवारी एक कोरोना बाधित रूग्ण आढळून आल्यानंतर काल सोमवारी अग्निशामक दलाच्या कर्मचाऱयांनी खबरदारीचा उपाय म्हणून निर्जंतुकीकरणाचे काम हाती घेतले. जुन्ता क्वॉर्टरमध्ये बहुसंख्य सरकारी कर्मचारी तसेच अधिकारी रहातात. जुन्ता क्वॉर्टरचे निर्जंतुकीकरण करण्याचा आदेश अतिरिक्त जिल्हाधिकारी सुरेंद्र नाईक यांनी दिला होता.
रविवारी जुन्ता क्वॉर्टर मधील एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल आल्यानतंर या व्यक्तीला आरोग्य खात्याने ताब्यात घेतले होते. ही व्यक्ती आरोग्य खात्याशीच संबंधित होती. जुन्ता क्वॉर्टरमध्ये एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने या संपूर्ण भागात भीतीचे वातावरण पसरले होते. अनेकांनी आपल्या खोल्यातून बाहेर पडण्याचे टाळले होते.
काल सोमवारी अतिरिक्त जिल्हाधिकारी सुरेंद्र नाईक यांनी संपूर्ण जुन्ता क्वॉर्टरच्या परिसराचे निर्जंतुकीकरण करण्याचा आदेश दिल्यानंतर जुन्ता क्वॉर्टरच्या सर्व इमारती तसेच सभोवतालच्या परिसराचे निर्जंतुकीकरण केले. जर या निर्जंतुकीकरणाच्या वेळी कोणी उपस्थित नव्हता तर त्याने स्वताच निर्जंतुकीकरण करावे असे अतिरिक्त जिल्हाधिकाऱयांनी कळविले होते.