प्रसाद नागवेकर/ मडगाव
मडगावात शुक्रवारी आढळेलेल्या भिकाऱयाच्या मृतदेहाची चाचणी करण्यात आली असता तो कोविड पॉझिटिव्ह निघाल्याने मडगावच्या शहरी भागात जागोजागी आढळणारे भिकारी तसेच रस्त्यांच्या कडेच्या, पदपथांवर व पॅसेजमध्ये आसरा घेणारे परप्रांतीय ही मडगाववासियांसाठी धोक्मयाची घंटा बनली आहे.
मडगाव ही आर्थिक राजधानी असल्याने येथे लोकांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे जागोजागी आढळणाऱया भिकाऱयांची संख्या लक्षणीय आहे. न्यू मार्केट व गांधी मार्केट या बाजारपेठांच्या प्रवेशद्वारावर, सडेकर लेन आदी ठिकाणी अपंग व्यक्ती वा अन्य बसून भीक मागत असतात. त्यापेक्षा जास्त मार्केटच्या सभोवतालील परिसरात भीक मागणारे आढळून येतात.
याखेरीज भंगार गोळा करणारे तसेच हमाली करून पॅसेजमध्ये वा पदपथांवर आश्रय घेणाऱयांची संख्या मोठी आहे. पिंपळकट्टानजीक, टी कॉर्नरजवळील पदपथ, मडगाव पालिका इमारतीची मागील पॅसेज, सिने लतानजीकचा परिसर, कोमुनिदाद इमारतीतील पॅसेज, स्टेशन रोड व रेल्वे स्थानक परिसरात असे दारू पिऊन पडून राहणारे कित्येक परप्रांतीय आढळतात. येथे हमाली वा भंगार गोळा करणारे व दारूच्या आहारी गेलेले शेकडो दारुडे आढळून येत असतात. काही जणांच्या अंगात काम करण्याचे बळ नसल्याने शेवटी ते भीक मागून एकवेळच्या जेवणाची व्यवस्था करण्यात वा दारू पिण्यात धन्यता मानत असतात. एखादी पॅसेज, पडकी इमारत वा दुकानांसमोरील पॅसेजमध्ये ते आसरा घेत असल्याचे दिसून येते.
आश्रयाची सोय करावी वा परत पाठवावे
कित्येक जण पदपथांवर वा रस्त्यांवर मृत पावत असल्याचे दिसून आले आहे. वर्षाला अशा शेकडो घटना नोंद होत असतात. पोलीस अनैसर्गिक मृत्यू म्हणून नोंद करतात. नंतर ओळख पटण्यासाठी मृतदेह कित्येक दिवस शवागारात ठेवावे लागत असतात. शेवटी पालिकेच्या सहकार्याने अशा मृतदेहांवर पोलिसांना अंत्यसंस्कार करावे लागतात. मात्र अशा वाढत्या अनैसर्गिक मृत्यूंपासून पोलिसांनी बोध घेतल्याचे दिसून येत नाही. परप्रांतीय मजुरांना लॉकडाऊच्या काळात आश्रय देऊन गावी परत पाठविण्यात आले होते. अशा प्रकारे उघडय़ावर राहणाऱयांच्या बाबतीत असेच करण्यात यावे अन्यथा त्यांना आश्रय देण्यात यावा, अशी मागणी होत आहे.