घाऊक फळ-भाजी विक्री करणाऱयांना सोपोच्या नावाखाली लुटले जात असल्याचा आरोप
प्रतिनिधी / मडगाव
मडगावतील पिंपळकट्टासमोरील चौकात पहाटेच्या वेळी घाऊक फळ-भाजी विक्री करणाऱयांकडून सोपो कंत्राटदार सोपो वसुलीच्या नावाखाली लूट करत असल्याची कैफियत घेऊन व्यापाऱयांनी मडगाव पालिकेवर गुरुवारी सकाळी मोर्चा नेला. गांधी मार्केट विक्रेते संघटनेचे नेते व माजी नगराध्यक्ष राजेंद्र आजगावकर यांच्या नेतृत्वाखाली सदर मोर्चा नेण्यात आला. सदर विपेते गांधी मार्केट विक्रेते संघटनेशी संलग्न असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
सोपो कंत्राटदाराला एका चौरस मीटर जागेसाठी फक्त 10 रु. सोपो गोळा करण्याचे अधिकार असताना त्यासाठी चक्क दिडशे ते दोनशे रुपये इतके पालिकेने नियुक्त केलेला कंत्राटदार वसूल करत असल्याचा दावा आजगावकर यांनी केला. यावेळी विपेत्यांनी सोपो कंत्राटदाराकडून पुरविल्या गेलेल्या काही पावत्या मुख्याधिकारी आग्नेल फर्नांडिस यांच्यासमोर सादर केल्या.
मुख्याधिकाऱयांकडून कंत्राटदाराला समज
यावेळी मुख्याधिकारी फर्नांडिस यांनी कंत्राटदार अल्ताफ यांना पाचारण केले व प्रति मीटर 10 रु. आणि त्यानंतर अतिरिक्त मीटरसाठी 10 रु. सोपो आकारण्यात यावा असे पालिकेने कंत्राटात स्पष्ट केले असल्याचे नजरेस आणून दिले. यापुढे पालिकेने दिलेल्या दरानुसार सोपो आकारणी करण्यात यावी अशी समज कंत्राटदाराला दिली असल्याचे मुख्याधिकारी फर्नांडिस यांनी सांगितले.
पिंपळकट्टाच्या सभोवतालील परिसरात घाऊक व्यापार करणाऱया विपेत्यांची यादी पालिकेकडे उपलब्ध आहे. यासंदर्भात पालिकेच्या मार्केट निरीक्षकांकडून सर्वेक्षण करण्यात येईल व या विपेत्यांना जागा मोजून मापून देण्यात येईल. नंतर त्यानुसार सोपो शुल्क ठरविण्यात येईल. त्यानंतर जादा पैसे आकारणीचा प्रश्न राहणार नाही, असे मुख्याधिकारी फर्नांडिस यांनी या प्रतिनिधीशी बोलताना स्पष्ट केले. 1 एप्रिल रोजी आर्थिक वर्षाच्या प्रारंभास पालिकेकडून सोपो कंत्राटदार नियुक्त केला जात असतो. या पहिल्याच दिवशी कंत्राटदाराकडून जादा सोपो आकारणी करून लूट केली जात असल्याची तक्रार पुढे आल्यामुळे हा चर्चेचा विषय बनला आहे.
सोपोच्या नावाखाली लुटण्याचे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत
सदर कंत्राटदाराने 70 लाख रुपयांच्या बोलीवर सदर सोपो कंत्राट घेतले असल्याची माहिती पालिकेच्या कर विभागाच्या सूत्रांनी दिली. पालिका मुख्याधिकाऱयांनी कंत्राटदाराच्या व्यवहारांवर नजर ठेवावी. यापुढे विपेत्यांना सोपोच्या नावाखाली लुटण्याचे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशारा आजगावकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिला.