प्रतिनिधी /पणजी
स्केच कलाकार योगेश प्रभुगावकर यांच्या कुटुंबीय आणि मित्रपरिवारातर्फे योगेश यांच्या चित्रांच्या प्रदर्शनाची दुसरी आवृत्ती रविवार दि. 20 रोजी रवींद्र भवन मडगावच्या कृष्णकक्षात सकाळी 10 वा. ते सायं. 6.30 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ वास्तुविशारद कमलाकार साधले, श्रीधर कामत बांबोळकर आणि रमेश सप्रे उपस्थित राहणार आहेत.
योगेश प्रभुगावकर यांनी मागील दहा वर्षात 500 व्यक्तिचित्रे रेखाटली आहेत. विराज प्रभुदेसाई, प्रणव सावर्डेकर, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमिताभ बच्चन, ग.दि.मा, ऋषी सुनक, रतन टाटा, प्रमोद सावंत, सुरेश वाडकर, सचिन तेंडुलकर अशा विविध क्षेत्रातील महनीय व्यक्तींची चित्र रेखाटून त्यांनी गोमंतकातच नव्हे तर देशविदेशात आपल्या चित्रप्रतिभेची ओळख पोहोचवली आहे. रविवार दि. 20 रोजी रवेद्र भवन मडगाव येथे 500 चित्रांचे प्रदर्शन आयोजित केले आहे.