फळ-भाज्या, मासेविक्रेत्यांकडून मिळेल तेथे अतिक्रमण करून बिनधास्त व्यवसाय, खरेदीसाठी गर्दी
प्रतिनिधी / मडगाव
मडगावच्या शहरी भागात सोशल डिस्टन्सिंगचे तीन तेरा वाजले असून मिळेल तेथे पदपथांवर भाजीपाला, फळे, मासेविपेते बिनधास्त व्यवसाय करत असल्याचे दिसून येत आहे. मागील काही दिवसांत पदपथ व्यापून व्यवसाय करणाऱयांच्या संख्येत वाढ झाली आहे मडगाव पालिकेकडून अशा पदपथांवर अतिक्रमण करून व्यवसाय करणाऱया बेकायदेशीर विपेत्यांवर कारवाई होतानाही दिसत नाही.
गांधी मार्केटमध्ये दाटीदाटीने दुकाने असून सोशल डिस्टन्सिंगचे तेथे पालन करता येणे शक्मय नसल्याचे आढळून आल्यावर मागील कित्येक दिवसांपासून हे मार्केट बंद ठेवण्यात आले आहे. या मार्केटमधील कित्येक व्यापारी रस्त्याच्या कडेला वा पदपथावर अतिक्रमण करून व्यवसाय करत आहेत. अशा ठिकाणी लोक रांगेत उभे राहून खरेदी करत नसल्याचे दिसून येते.
न्यू मार्केटातही खबरदारीकडे दुर्लक्ष
जीवनावश्यक वस्तूंची दुकाने खुली ठेवण्यात यावीत, मात्र अशा ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग राखले जाईल याची काळजी घ्यावी, असे आवाहन सरकारने दोन आठवडय़ांपूर्वी केले होते. न्यू मार्केटमध्ये जास्त करून किराणामालाची दुकाने असल्याने सकाळी दोन तास ती खुली ठेवण्याची मुभा देण्यात आली होती. त्यानुसार सुरुवातीचे दोन ते चार दिवस सोशल डिस्टन्सिंग पाळून व्यवसाय झाला. पालिकेचे मार्केट निरीक्षक व कामगार त्यावर देखरेख ठेवत होते. मात्र सध्या येथे सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नसल्याचे दिसून येत आहे.
शहरातील काही सुपरस्टोअर्स दिवसातून सहा ते सात तास खुर्ले ठेवण्यात येत आहेत. तेथे रांगेत ग्राहकांना सोडण्यात येते. सेनिटायजरने हात निर्जंतुक करण्याची सोयही करण्यात आली आहे. मात्र अशा सुपरस्टोअर्समधील जागा कमी असल्याने तेथे सोशल डिस्टन्सिंग पाळणे शक्मय होत नसल्याचे दिसून येते. शहरातील रॉयल नामक एका कोल्ड स्टोअरमध्ये आठवडाभरापूर्वी रांगेत ग्राहकांना उभे राहायला लावून आंत सोडण्यात येत होते. मात्र आता त्या आस्थापनातही गदी दिसून येते. बेकायदा मासळी विकणाऱया विपेत्यांकडेही गदी होत असून सोशल डिस्टन्सिंगचे तीन तेरा वाजल्याचे स्पष्ट होत आहे.