प्रतिनिधी/ मडगाव
sगेल्या ऑगस्ट महिन्यात ‘लिक्वडिशेन’मध्ये गेलेल्या मडगाव अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या ठेवीदारांसमोर ठेवीच्या रूपाने ठेवलेली आपली रक्कम परत मिळेल की नाही, याबद्दल संशय होता. बँकेच्या दहा हजार ठेवीदारांनी ठेवी परत मिळविण्यासाठी अर्ज केले होते. आता डिपॉझिट इन्शुरन्स अँड पेडीट गॅरंटी कॉर्पोरेशनने (डीआयसीजीसी) छाननी करून व ठेवीदारांच्या अर्जांचा अभ्यास करुन पाच लाख रुपयापर्यंतची रक्कम परत करण्यास हिरवा कंदील दाखवलेला आहे.
गेल्या आठवडय़ापासून ठेवीदारांना रक्कम परत करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे असे लिक्वडिटेरने नियुक्त केलेले अधिकारी किशोर आमोणकर यांनी पत्रकारांना सांगितले. आतापर्यंत दहा हजारपैकी दोन हजार ठेवीदारांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात आली आहे. अजूनही अर्ज स्वीकारणे चालू असल्याचे आमोणकर यांनी सांगितले.
तब्बल 56,665 खातेधारकांपैकी
केवळ 10 हजार खातेधारकांचेच अर्ज
मडगाव अर्बन बँकेचे एकूण 56,635 खातेधारक आहेत. मात्र केवळ दहा हजार खातेधारकांनी रक्कम परत मिळविण्यासाठी अर्ज केले. यातील जवळजवळ 99 टक्के खातेधारकांना त्यांची पूर्ण म्हणजे पाच लाखापर्यंतची रक्कम मिळणार आहे. खातेधारकांचे पैसे परत करण्यासाठी बँकेने 136 कोटी रुपयांची तरतूद केली असली तरी बँकेच्या एकूण ठेवी 189.81 कोटी रुपये आहेत. जी बाकी रक्कम लागेल ती ऋण वसुलीतून व बँकेकची मालमत्ता विकून फेडली जाईल असेही आमोणकर यांनी सांगितले. लॉकरवाल्यांनी बँकेशी संपर्क साधून आपल्या वस्तू घेऊन जाव्यात असे आवाहन केले आहे.