अर्ज सादर करण्यास दोन महिन्यांची मुदत
प्रतिनिधी /मडगाव
मडगाव अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेने, सर्व ठेवीदारांना आपले दावे बँकेच्या संबंधित शाखांनी 2 महिन्यांच्या वेळेत त्यांचे योग्य भरलेले ‘ठेवीदार हक्क अर्ज’ बँकेत जमा करण्यास सांगितले आहे. हे अर्ज बँकेच्या सर्व शाखांमध्ये उपलब्ध आहेत.
सरकारने नियुक्त केलेले लिक्वीडेटर एस. व्ही. नाईक यांनी जाहीर नोटीस दिली असून सर्व ठेवीदारांना आपले दावे सादर करण्यासाठी दोन महिन्यांची मुदत दिली आहे. ‘प्राप्त झालेल्या दाव्यांची चौकशी केली जाईल आणि डीआयसीजीसीच्या सामान्य अटींनुसार बँकेच्या खाते वहीच्या आधारे निर्णय घेतला जाईल’ असे नाईक यांनी कळविले आहे.
लॉकर धारकांना 30 सप्टेंबरची मुदत
सर्व लॉकर धारकांना 30 सप्टेंबर 2021 पूर्वी लॉकर्स सरेंडर करण्यास आणि त्यांच्या मौल्यवान वस्तूंचा ताबा घेण्यास सांगितले आहे. मडगाव अर्बनचे व्यवस्थापकीय संचालक किशोर आमोणकर यांची नियुक्त अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ठेवीदार अधिक स्पष्टीकरण मागू शकतात. यावषी जुलैमध्ये, आरबीआयने द मडगाव अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, मडगाव, गोवा, यांचा परवाना रद्द केला होता.