मडगाव / प्रतिनिधी
मडगाव मडगावेचे कर्मचारी कोविडबाधित निघू लागले असतानाही पालिकेकडून थर्मल गनची व्यवस्था करण्यास दिरंगाई होत असल्याबद्दल तीव्र संताप व्यक्त होऊ लागला होता. या पार्श्वभूमीवर महिन्याभरापासून बंद असलेली पालिकेत प्रवेश करणाऱयांची थर्मल गनद्वारे करण्यात येणारी तपासणी पुन्हा सुरू करण्यात येणार असे नगराध्यक्षा पूजा नाईक यांनी रविवारी स्पष्ट केले होते. त्यानुसार सोमवारी थर्मल गनची व्यवस्था करून ही तपासणी पुन्हा सुरू करण्यात आली. यासाठी सुरक्षारक्षकाची नेमणूक करण्यात आली
दरम्यान मडगाव पालिकेतील आणखी दोन कर्मचारी कोविडबाधित निघालेले असून
त्यामुळे मडगाव पालिकेतील एकूण कोविडबाधितांची संख्या पाचवर पोहोचलेली आहे. सध्या लोकांना पालिकेत प्रवेश दिला जात नाही. सोमवारी सकाळच्या सत्रात कर्मचाऱयांची काही प्रमाणात उपस्थिती दिसून आली.
मात्र सायंकाळी तुरळक उपस्थिती आढळून आली.
दरम्यान, मडगाव पालिका कर्मचाऱयांनी कोविडसाठी सकारात्मक चाचणी आल्याची माहिती मिळाली आहे. शुक्रवारी आढळलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 3 होती तर सोमवारी आणखी 2 मिळून पॉझिटिव्ह रुग्णांची 5 अशी नोंद झाली आहे.
मडगाव पालिकेचे कर्मचारी विविध ठिकाणाहून येणाऱया शेकडो लोकांच्या संपर्कात येतात. अशा प्रकारे त्यांना संसर्ग होण्याची शक्मयता आहे तसेच पालिकेचे कर्मचारी वेगवेगळय़ा ठिकाणाहून येतात आणि त्यांच्याबरोबर संसर्ग कार्यालयात येण्याचीही तितकीच शक्मयता असते याकडे शॅडो कौन्सिल फाॅर मडगावने मुख्याधिकारी अजित पंचवाडकर व नगराध्यक्ष पूजा नाईक यांना सादर केलेल्या निवेदनातून लक्ष वेधले आहे. अशा परिस्थितीत, सर्व कर्मचाऱयांच्या सुरक्षिततेसाठी आणि पालिकेला भेट देणाऱयांच्या सुरक्षिततेसाठी सर्व कर्मचाऱयांच्या चाचण्या घेण्याची गरज व्यक्त केली आहे.
पालिकेच्या कित्येक कर्मचाऱयांनी आमच्याशी संपर्क साधला आहे आणि पालिका इमारतीत चाचणी घेण्याची व्यवस्था करण्याची आवश्यकता व्यक्त केली आहे. त्याप्रमाणे आम्ही पालिकेच्या कर्मचाऱयांच्या चाचण्यांसाठी त्वरित पावले उचलावी यासाठी विनंती करत असल्याचे कौन्सिलचे निमंत्रक सावियो कुतिन्हो यांनी निवेदनातून स्पष्ट केले आहे. आणखी एक पैलू ज्याचा विचार करणे आवश्यक आहे, नवीन एसओपीनुसार घरात विलगीकरणात राहण्यास परवानगी दिली आहे आणि पुढे, अशा लोकांची माहिती पालिका ककर्मचाऱयांना नसल्यामुळे, आम्हाला भीती वाटते की फील्ड स्टाफ देखील कोविड जोखीमसाठी असुरक्षित आहेत. . म्हणून त्यांच्या सुरक्षेसाठी तसेच सर्वसामान्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना करणे आवश्यक आहे. राज्यात 24 तासांत 500 प्रकरणांचा धोकादायक दर नोंदविला जात असल्याने सर्व प्रतिबंधात्मक आणि सुरक्षिततेचे उपाय राबविण्यांत यावे असे आवाहन शॅडो कौन्सिलने या निवेदनातून केले आहे.