काम न करता वेतन घेणाऱयांचा शोध घेण्याचे सोडून योग्य प्रकारे काम करण्याचा संदेश
प्रतिनिधी/ मडगाव
मडगाव पालिकेचे रोजंदारीवरील काही कामचुकार कामगार काम न करताच वेतन घेत असल्याबद्दल मंडळाच्या बैठकीत नगरसेवकांनी आवाज उठविल्याने शनिवारी रोजंदारीवरील सर्व कामगारांची परेड घेऊन काम न करता वेतन घेणाऱयांचा शोध घेण्याऐवजी या सर्व कामगारांना पालिका सभागृहात बसवून केवळ योग्य प्रकारे काम करा, असा संदेश देण्यात आला. यावेळी कामगारांची हजेरी घेतली गेली नाही वा उपस्थित कामगार मोजलेही गेले नाहीत. त्यामुळे ही बैठक म्हणजे एकंदर डोळय़ांना पाणी लावण्याचा प्रकार घडला.
दुपारी झालेल्या या बैठकीला नगराध्यक्ष लिंडन पेरेरा, उपनगराध्यक्ष दिपाली सावळ, सेनिटरी विभागाचे अधिकारी व पर्यवेक्षक उपस्थित होते. दामोदर शिरोडकर या नगरसेवकाने मंडळाच्या बैठकीत वरील विषयावरून आवाज उठविला होता. म्हणून सदर बैठक घेण्यात आली. मात्र यातून काहीही साध्य झालेले दिसून येत नसून कामगारांना कामावर न येता वेतन देण्यात येत असल्याच्या आरोपांना पुष्टी मिळत असल्याची प्रतिक्रिया मडगाववासियांकडून व्यक्त करण्यात येत आहे. यामागे रॅकेट असण्याची आणि अधिकारी व मंडळातील काहींचे हात ओले केले जात असण्याची शक्मयताही वर्तविली जात आहे.
मडगाव पालिकेतील रोजंदारीवरील काही कामगारांना शनिवार, रविवार कामावर येत नसताना त्या दिवसांचे वेतन दिले जात असल्याच्या कैफियती रोजंदारीवरील अन्य कामगारांनी सोमवारी दुपारी मुख्याधिकारी आग्नेल फर्नांडिस यांच्यासमोर मांडल्य?ानंतर त्याचे पडसाद बुधवारी पार पडलेल्या पालिका मंडळ?ाच्या बैठकीत उमटले होते. नगरसेवक शिरोडकर यांनी यासंदर्भात मुख्याधिकारी फर्नांडिस यांना जाब विचारला असता शनिवारी सकाळी रोजंदारीवरील तसेच कंत्र?ाटी पद्धतीवर काम करणाऱया सर्व कामगारांची परेड घेऊन यासंदर्भात खातरजमा करण्याचे ठरविण्यात आले होते. मुख्याधिकाऱयांनी हजेरीची नोंद ठेवणारे संबंधित पर्यवेक्षक व अधिकाऱयांना विश्वासात घेऊन आवश्यक कृती करण्याचे आश्वासन दिल्याचे कैफियत मांडलेल्या रोजंदारीवरील काही कामगारांनी सांगितले होते. तर आरोप करणाऱया कामगारांनी काम न करता वेतन घेणाऱयांची ओळख परेडमध्ये पटवून द्यावी, असे फर्नांडिस यांनी स्पष्ट केले होते.