वृत्तसंस्था/चेन्नई
मणिपूरचा 20 वर्षीय फुटबॉलपटू निथोई मीतेईबरोबर इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेचे आतापर्यंत दोनवेळा विजेतेपद मिळविणाऱया चेन्नईन एफसी संघाने नुकताच नवा करार केला आहे.
चेन्नईन एफसी आणि मीतेई& यांच्यात तीन वर्षांच्या कालावधीसाठी हा करार करण्यात आला आहे. इंफाळमध्ये जन्मलेल्या मीतेई&ने 2017 साली भारतात झालेल्या 17 वर्षाखालील वयोगटाच्या फिफा विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत मीतेईचा भारतीय संघात समावेश होता. 2018 मधील यू-18 सॅफ स्पर्धेत भारताने पहिल्यांदाच जेतेपद मिळविले होते. त्यात चांगली कामगिरी केल्याने 2019 साली मीतेईने सर्वोत्तम फुटबॉलपटूचा पुरस्कार पटकाविला होता. 2017 साली मीतेईने इंडियन ऍरोस एफसी संघाकडून आपल्या व्यावसायिक फुटबॉल कारकीर्दीला प्रारंभ केला होता. इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेत मीतेईने नॉर्थ इस्ट युनायटेड एफसी संघाकडून दोन वर्षांच्या कालावधीत 24 सामने खेळले आहेत.