इंफाळ / वृत्तसंस्था
मणिपूर विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील 38 जागांसाठी सोमवारी मतदान झाले. ते 80 टक्क्यांहून अधिक प्रमाणात झाल्याचे अनुमान आहे. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 78.03 टक्के मतदान झाले होते. मंगळवारी अंतिम टक्केवारी घोषित होण्याची शक्यता आहे. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली.
मतदान सुरु असताना फेरझवाल जिल्हय़ातील तिपाईमुख मतदारसंघात एका सुरक्षा रक्षकाचा तर एका निवडणूक अधिकाऱयाचा मृत्यू झाला. मृत्यू पावलेला सुरक्षा रक्षक हा आठव्या मणिपूर रायफल्स तुकडीतील होता. त्याचा मृत्यू बंदुकीची गोळी लागल्याने झाल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले. तर निवडणूक अधिकाऱयाचा मृत्यू पक्षाघाताच्या झटक्याने झाल्याची माहिती देण्यात आली.
मतदानासाठी एकंदर 1,721 मतदानकेंद्रांची व्यवस्था करण्यात आली होती. या टप्प्यात राज्याच्या ईशान्य भागातील मतदासंघांमध्ये मतदान घेण्यात आले. मतदानाचा दुसरा आणि अंतिम टप्पा 5 मार्चला आहे. त्या टप्प्यात 22 मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात 12,09,439 मतदारांपैकी 80 टक्क्यांहून अधिकांनी मतदानाच्या अधिकाराचा उपयोग केला.