मणिपूरमध्ये सत्तारुढ भाजप विधानसक्षा निवडणुकीत यावेळी स्वबळ दाखवून देण्यास तयार आहे. भाजपने 2017 मध्ये सहकारी पक्ष आणि अपक्षांच्या मदतीने राज्यात पहिल्यांदाच सत्ताप्राप्त केली होती. परंतु केंद्रीय मंत्री प्रतिमा भौमिक आणि राज्याचे भाजप प्रभारी अशोक सिंघल यांनी पक्ष यावेळी स्वबळावर निवडणूक लढविणार असल्याचे संकेत दिले आहेत.
समान विचारसरणी असणारे पक्ष आणि सहकाऱयांसोबत निवडणूकपूर्व आघाडीकरता चर्चा करत आहोत. परंतु भाजप स्वबळावर पूर्ण बहुमत प्राप्त करणार असल्याचे सिंघल यांनी म्हटले आहे. केंद्रीय नेतृत्व लवकरच उमेदवारांची घोषणा करणार आहे. राज्यातील पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते आगामी निवडणुकीत भाजपचा विजय सुनिशित करण्यासाठी पूर्णपणे सक्रीय असल्याचे विधान केंद्रीय मंत्री प्रतिमा भौमिक यांनी केले आहे. मागील विधानसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडीने काँग्रेसला सत्तेतून बेदखल केले होते. भाजपला 21 जागा मिळाल्या होत्या.
तर सरकारमध्ये सामील घटक पक्ष एनपीपीने यापूर्वीच स्वबळावर निवडणूक लढविणार असल्याची घोषणा केली आहे. तर नागा पीपल्स प्रंटनेही निवडणूकपूर्व आघाडीबद्दल कुठलाच निर्णय घेतलेला नाही. मणिपूरमध्ये दोन टप्प्यांमध्ये 27 फेब्रुवारी आणि 3 मार्च रोजी मतदान होणार आहे.
Previous Articleवनक्षेत्रपाल यांनी केली शिवकालीन राजमार्गाची पाहणी
Next Article ‘मिशन बंधारे’तून लाखो लिटर पाणी संचय!
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.