मणेराजूरी / प्रतिनिधी
अनेक राजकीय ‘कोडी ‘ सोडविण्यात माहीर असणारे व करेक्ट कार्यक्रमाचे प्रणेते असणाऱ्या जयंत पाटील यांनी ‘ जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पूर्वसंध्येला ‘ कलावंतीणचे ‘कोडे ‘ सोडविण्याचा प्रयत्न केला ;व या ऐत्याहिसिक ‘कोड्याची ‘ कुतुहलाने माहिती घेतली !
सांगली जिल्हयाचे पालकमंत्री तथा राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील हे जिल्हा बँकेच्या निवडणूकीमुळे सांगली जिल्हयात तळ ठोकून आहेत; या निवडणूकीच्या निमित्ताने त्यांच्या -जत ‘ – कवठेमहांकाळ या तालुक्यात ‘ सभा ‘ बैठका ‘ भेटीगाठी सुरु आहेत ;त्या संपवून कवठेमहांकाळहून तासगावकडे येताना ‘ त्यांच्या गाडयांचा ताफा मणेराजूरीच्या ‘कोडयाच्या ‘ माळावर थांबला व त्यांनी इतिहासकालीन कलावंतीने घातलेले ‘कोड ‘ पाहिले; त्यांचे स्वागत खंडू पवार यांनी केले व या कोडयाची माहिती जयंत पाटील यांना दिली.
सुमारे चारशे ते पाचशे वर्षापूर्वीचे हे कोडे म्हणजे इतिहासकालीन ठेवा आहे ;मणे राजूरी गांवच्या हद्दीत व तर ‘योगेवाडी ;गव्हाण ;बोरगांव ;मळणगाव या पाच गावाच्या सीमेवर या इतिहासकालीन कोडयाची रचना आहे; या कोडया बाबत अनेक प्रचलित अख्यायीका सांगितल्या जातात ;या ठिकाणी दगडांच्या विशेष रचना करून ते गोलाकार रचले गेले आहेत ;त्यात आत जाता येते ;परंतु बाहेर पडता येत नाही ;फार वर्षापूर्वी एका कलावंतीनीने ‘राजाला ‘घातलेले हे कोडे होते ;व ते या राजालाही सोडविता आले नाही ;ते कोड आजही अस्तित्वात आहे ;यामुळेच या परिसराला ‘कोडयाचा माळ’ म्हटल जात . मणेराजूरीच्या या कोडयाची भुरळ व कुतुहूल अनेकांना आहे ;या हायवेवरुन जाणारे – येणारे पर्यटक येथे थांबून हे कोडे सोडविण्याचा प्रयत्न करतात.
शनिवारी दुपारी या मार्गावरून जाताना राज्यांचे जलसंपदा मंत्री मा ,जयंत पाटील यांनाही हे कोडे सोडविण्याचा मोह आवरता आला नाही आपल्याबरोबर असलेल्या स्वीय सहायकाला त्यांनी ‘ दगडाच्या ‘ विशेष पध्दतीने रचलेल्या या कोड्यात प्रवेश करण्यास सांगून ते सोडविण्यास सांगितले ‘बाहेरून त्यास सूचना केल्या ;परंतु या कोडयात आत जाण्याचा मार्ग सापडतो पण बाहेरच पडता येत नाही ‘ त्यामुळे नामदार जयंत पाटील हे देखील अवाक् झाले. यावेळी ‘ शेतीच्या व पिण्याच्या पाण्याची परिस्थिती ‘पावसामुळे नुकसान झालेल्या द्राक्ष शेतीची ही माहिती त्यांनी घेतली व सूचना केल्या .