मणेराजूरी/प्रतिनिधी
मणेराजूरी येथील रोहीत भूपाल माने या युवकाची शेकोबा डोंगरावर गळफास घेवून आत्महत्या केली. या अगोदर याच ठिकाणी तिघांच्याआत्महत्येचे प्रकरण ताजे असताना ही घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
व्हेंलटटाईन दिनाच्या सायंकाळीच ही घटना घडल्याने अनेक तर्कवितर्क व्यक्त होत आहेत. घटनास्थळी मयत रोहीत याचा मोबाईलचा कॅमेरा सुरुच होता. चिंचणी येथील काहीजण डोंगरावर सोमवारी सायंकाळी व्यायमला आले होत. त्यांना हा प्रकार निर्दशनास आला.
मणेराजूरी ता. तासगाव येथील रोहित भूपाल माने (वय २२) याने सोमवारी सायंकाळी शेकोबा डोंगरावर देवालयानजीक असणाऱ्या झाडास गळफास घेवून आत्महत्या केली. सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. आत्महत्याचे नेमके कारण समजू शकले नाही. आत्महत्येचे नेमके कारण काय ? याबाबत पोलीस तपास करत आहेत.
दरम्यान माने हा महाराष्ट्र डिझायर रिजर्व फोर्स सिक्युरीटी ( एमडीआरएफ )कोल्हापूर यामध्ये दाखल झाला होता. नुकतीच त्याच्यावर सांगली जिल्ह्यातील जबाबदारी देण्यात आली असल्याचे समजते. याबाबतची माहिती पोलीस पाटील दिपक तेली यांनी तासगांव पोलीसांना दिली. घटनास्थळी तासगाव पोलिसांनी पंचनामा केला व शवविच्छेदनानंतर सोमवारी रात्री उशीरा त्याचेवर अंत्यंसंस्कार करणेत आले.