प्रतिनिधी/ बेळगाव
मण्णिकेरी येथील जवानाचा नाशिक येथे हृदयविकाराने मृत्यू झाला आहे. त्या जवानाचा मृतदेह रविवारी मण्णिकेरी येथे आणण्यात येणार असून त्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
फकिरा शट्टू गुडाजी (वय 38) असे त्या जवानाचे नाव आहे. महिन्यापूर्वी त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते. त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी महिन्याभरापूर्वी फकिरा हे मण्णिकेरी येथे आले होते. त्यानंतर ते पुन्हा नाशिक येथे सेवेत रुजू झाले होते. मात्र, त्यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला आहे. फकिरा यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई, भाऊ, बहीण असा परिवार आहे.