बेळगाव :
मण्णीकेरी येथील फकिरा शट्टू गुडाजी (वय 40) या जवानाचा नाशिक येथे मृत्यू झाल्याची घटना गुरुवार दि. 30 रोजी घडली आहे. फकिरा हा काही दिवसांपूर्वी सुटीवर आला होता. त्यानंतर तो सुटी संपली म्हणून दहा दिवसांपूर्वी पुन्हा सेवेत रुजू झाला होता. मात्र, क्वारंटाईनमध्ये असतानाच त्याचा मृत्यू झाला.
या घटनेमुळे मण्णीकेरी गावावर शोककळा पसरली आहे. त्याच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई-वडील, भाऊ असा परिवार आहे.