वार्ताहर / हिंडलगा
मण्णूर येथील श्री मरगाई देवी शेतकरी संघटना व ग्रामस्थांच्यावतीने आयोजित बैलगाडीने रिकामी गाडा ओढण्याच्या शर्यतीत सरोळी येथील श्री महादेव प्रसन्न या बैलजोडीने सर्वाधिक अंतर ओढत प्रथम क्रमांक पटकाविला. तर शिवाजी मल्लेशी कणबरकर (मुतगा) यांच्या बैलजोडीने द्वितीय क्रमांक पटकावून शर्यत प्रेमींच्या डोळय़ाचे पारणे फेडले.
शर्यतीमध्ये बेळगावसह परिसरातील शेकडो हौशी बैलजोडी मालकांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये सर्वाधिक अंतर ओढत 18 क्रमांक विजेते ठरले ते पुढीलप्रमाणे.
श्री महादेव प्रसन्न (सरोळी), शिवाजी कणबरकर (मुतगा), बेनकाई प्रसन्न (बेटगीरी), श्री बसवेश्वर प्रसन्न (बसरीकट्टी), नारायण लक्ष्मण कार्वेकर (मोदेकोप), श्री सिद्धनाथ पावणाई प्रसन्न, राम-लक्ष्मण श्री सिद्धेश्वर प्रसन्न, (राजहंसगड), कलमेश्वर -बसवेश्वर प्रसन्न (बसवण कुडची), श्री मरगाई प्रसन्न (मोदेकोप), श्री चव्हाटा प्रसन्न (वाघवडे), चाळोबा प्रसन्न (बुक्मयाळ), श्री कलमेश्वर प्रसन्न (कालकुंद्री), श्री ज्योतिर्लिंग प्रसन्न (बेळगुंदी), बेनकाई प्रसन्न (बेटगेरी), श्री सोमनाथ प्रसन्न (सांबरा), श्री सिद्धेश्वर प्रसन्न (कुदनूर), श्री लक्ष्मी प्रसन्न (कुदनूर), श्री मरगाईदेवी प्रसन्न (बेकिनकेरे) तसेच श्री नागनाथ प्रसन्न (बेकिनकेरे) या बैलजोडीने 21 वा लकी क्रमांक पटकाविला. सर्व विजेत्यांचा मान्यवरांच्या उपस्थितीत रोख बक्षीस व स्मृतीचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पुंडलिक शहापूरकर, व्यंकट शहापूरकर, जोतिबा चौगुले यांच्यासह संघटनेचे अध्यक्ष मधुकर चौगुले, तानाजी तरळे, विश्वनाथ चौगुले, ग्रामपंचायत सदस्य जोतिबा शहापूरकर, रामा चौगुले, दत्तू चौगुले, आप्पय्या चौगुले, आण्णाप्पा कटग्याण्णवर, मुकूंद तरळे, दशरथ सांबरेकर, परशराम तरळे, यशवंत होनगेकर, मारुती मंडोळकर, लक्ष्मण चौगुले, कृष्णा कालकुंद्री, खाचू तरळे, भीमराव तरळे, भावरथ चौगुले, कल्लाप्पा कदम यांच्यासह शर्यतप्रेमी व ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते. शर्यतीच्या लाभ ग्रामस्थ आणि शौकिनांनी घेतला.