वार्ताहर/ हिंडलगा
आंबेवाडी ग्राम पंचायत निवडणुकीसाठी मण्णूरमधील चार वॉर्डातून बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती पुरस्कृत मण्णूर शाखेतर्फे अधिकृत उमेदवार म्हणून उभे असलेल्या उमेदवारांच्या प्रचाराला धडाक्यात सुरुवात करण्यात आली.
माजी तालुका पंचायत सदस्य व समिती नेते एस. एल. चौगुले यांच्या नेतृत्वाखाली वॉर्ड क्रमांक 7 चे उमेदवार अशोक चौगुले, प्रभाकर माडुळकर, अर्चना पुण्णाजीचे, यशोदा गोविंदाचे, वॉर्ड क्रमांक 8 चे अमेदवार रामा चौगुले, वॉर्ड क्रमांक 9 चे उमेदवार संजय चौगुले, महादेवी तेरणी, वॉर्ड क्रमांक 10 चे शिवाजी कदम व उज्वला सांबरेकर यांच्या प्रचाराला नारळ फोडण्यात आला. त्यानंतर गावातील मंदिरामध्ये दर्शन घेऊन संपूर्ण गावामध्ये प्रचार करण्यात आला. यावेळी मतदारांच्या घरोघरी जाऊन भेटी घेत भरघोस मतांनी निवडून देण्याची विनंती केली. गावातील मतदारांतूनही म. ए. समिती उमेदवारांना पाठींबा मिळत असून प्रचंड मतांनी निवडून देण्याचा निर्धार मतदारांनी केला आहे. यावेळी अभियंते अरुण कदम, माजी ग्राम पंचायत उपाध्यक्ष सुधीर काकतकर, सदस्य प्रकाश मंडोळकर, सविता चौगुलेसह समिती कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.