वार्ताहर /हिंडलगा
मण्णूर येथील श्री ज्योतिर्लिंग मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटीची 15 वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत पार पडली. अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन दिलीप सोहनी होते. प्रारंभी दि मार्कंडेय सोसायटीचे चेअरमन प्रसाद चौगुले यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. सोसायटीचे संस्थापक कै. आर. डी. चौगुले यांच्या प्रतिमेचे पूजन मार्कंडेय सोसायटीचे संचालक भाऊराव सांबरेकर यांच्या हस्ते झाले. महालक्ष्मी प्रतिमापूजन रेखा तरळे व विमल डोणकरी यांच्या हस्ते झाले. मार्कंडेय सोसायटीचे संचालक विनय कदम, मुरलीधर बाळेकुंद्री, अशोक सुतार, कृष्णा नाईक यांनी मनोगत व्यक्त केले. सेपेटरी वीणा बांदेकर यांनी अहवाल वाचन केले. चेअरमन दिलीप सोहनी यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेताना मिळालेल्या नफ्यातून सभासदांना लाभांश वाटप करणार असल्याचे सांगितले. यावेळी व्हा. चेअरमन रविंद्र चौगुले, संचालक के. के. देवरमनी, यल्लाप्पा काकतकर, यल्लाप्पा शहापूरकर, विश्वनाथ चौगुले, वैभव कदम, भरतेश केंचण्णावर, विमल डोणकरी, रेखा तरळे यांच्यासह सभासद, सल्लागार, मार्कंडेय सोसायटीचे संचालक व कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन वैभव कदम यांनी केले. संचालक यल्लाप्पा काकतकर यांनी आभार मानले.