प्रतिनिधी / बेळगाव
बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमिवर शुक्रवारी सायंकाळी मतदान जागृतीसाठी बिम्स्च्या विद्यार्थ्यांनी कॅन्डल मार्च केले. बिम्स् (सरकारी वैद्यकीय महाविद्यालय) पासून राणी चन्नम्मा चौकापर्यंत हा कॅन्डल मार्च झाला. जिल्हा स्वीप समितीचे अध्यक्ष व जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन एच. व्ही., पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे, जिल्हा पंचायतीचे मुख्य लेखाधिकारी परशराम दुडगुंटी, बिम्स्च्या सीईओ आफरीन बानु बळ्ळारी, मार्केटचे एसीपी सदाशिव कट्टीमनी, जिल्हा स्वीप आयकोन रोहन कोकणे आदी अधिकारी यावेळी उपस्थित होते. चन्नम्मा सर्कलहून हा कॅन्डल मार्च पुन्हा बिम्स्मध्ये पोहोचला.