जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांची अधिकाऱयांना सूचना
प्रतिनिधी /बेळगाव
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱयांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. मतदान यंत्रे हाताळण्याबाबत तसेच मतदान यंत्रणांबाबत कोणत्याही प्रकाराचा संशय असल्यास किंवा कोणतीही अडचण असल्यास याबाबात वरिष्ट अधिकाऱयांकडे माहिती द्यावी, अशी सूचना जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी प्रशिक्षणावेळी दिली.
महापालिका निवडणुकीसाठी सेंट जोसेफ, सेंट पॉल आणि सेंट मेरी आदी ठिकाणी अधिकाऱयांना निवडणूक प्रक्रिया आणि मतमोजणीबाबत प्रशिक्षण देण्यात येत आहे. या प्रशिक्षण केंद्रात जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी सोमवारी भेट दिली. यावेळी अधिकाऱयांना सूचना करताना म्हणाले, सर्व कामे नियोजनबद्ध आणि वेळेत होणे आवश्यक आहे. याकरिता अधिकाऱयांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. मतदानावेळी किंवा मतमोजणीवेळी मतदान यंत्रात बिघाड झाल्यास किंवा अडचण निर्माण झाल्यास गोंधळून जाऊ नका. याबाबत वरिष्ट अधिकाऱयांना माहिती देऊन समस्यांचे निराकरण करून घ्या, असे सांगितले. यावेळी महापालिकेच्या अधीक्षक अभियंत्या लक्ष्मी निपाणीकर उपस्थित होत्या.