बी. के. मॉडेल शाळा परिसरात कडक बंदोबस्त
प्रतिनिधी/ बेळगाव
महापालिका निवडणुकीत 58 वॉर्डांकरिता शुक्रवारी मतदान झाले. निवडणुकीत खूपच कमी मतदान झाले असून निकाल काय लागणार? याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. सोमवारी सकाळी 7 वाजल्यापासून मतमोजणी प्रक्रियेला प्रारंभ होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर शनिवारी बी. के. मॉडेल शाळेच्या परिसरात ये-जा करण्यास माध्यमांसह सर्वांनाच प्रवेश बंद ठेवण्यात आला होता.
शुक्रवारी सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू होती. त्यानंतर सर्व इव्हीएम मशीन बी. के. मॉडेल शाळेतील स्ट्राँग रुममध्ये बंदिस्त ठेवण्यात आले. सोमवार दि. 6 रोजी सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीस प्रारंभ होणार आहे. त्याकरिता महापालिका प्रशासनाने आवश्यक तयारी सुरू केली आहे. या प्रक्रियेला 7 पासून सुरुवात होणार असून पक्ष व उमेदवारांच्या उपस्थितीत स्ट्राँग रूम खुला करून मतमोजणीस सुरूवात होणार आहे. प्रत्येक पाच वॉर्डांकरिता एक खोली याप्रमाणे 12 खोल्यांमध्ये मतमोजणी होणार आहे. तर प्रत्येक खोलीमध्ये दोन टेबलवर मतमोजणी करण्यात येणार आहे. त्यामुळे दुपारी 12 वाजेपर्यंत सर्व निकाल घोषित होण्याची शक्मयता आहे.
निवडणुकीनंतर मतमोजणीसाठी प्रशासनाने तयारी चालविली आहे. बी. के. मॉडेल शाळा परिसरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या परिसरात ये-जा करण्यास बंदी घालण्यात आली आहे.