पहाटे 6 पासून मध्यरात्री 12 पर्यंत दारु विक्री राहणार बंद
प्रतिनिधी/ बेळगाव
कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मतमोजणी काळात दारु विक्रीवर निर्बंध घालण्यात आले असून बुधवारी पहाटे 6 पासून रात्री 12 पर्यंत जिह्यातील दारु दुकाने बंद ठेवण्यात येणार असल्याचे पत्रक पाठविण्यात आले आहे. बेळगाव तालुक्मयाला मात्र यामधून वगळण्यात आल्याचे या पत्रकात म्हटले आहे.
मतमोजणी बुधवार दि. 30 रोजी सकाळी 8 पासून रात्री उशीरापर्यंत सुरू राहणार आहे. त्यामुळे मद्य विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. याबाबत अबकारी उपायुक्त तसेच जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी हे पत्रक जाहीर केले आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी हा आदेश काढण्यात आला आहे.