ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प पराभवाच्या छायेत असल्याने त्यांनी पूर्वीच जाहीर केल्याप्रमाणे चार राज्यातील मतमोजणीविरोधात न्यायालयात दावा दाखल आहे.
ट्रम्प यांनी यापूर्वीच राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या मतमोजणी प्रक्रियेत घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. आपला पराभव समोर दिसू लागल्यानंतर ट्रम्प यांनी जॉर्जिया, मिशीगन, पेनसिल्वानिया येथे मतमोजणीविरोधात न्यायालयात दावा केला आहे. तर विस्कॉन्सिन येथे फेरमोजणीसाठी याचिका दाखल केली आहे.
ट्रम्प यांचे प्रतिस्पर्धी जो बायडेन विजयाच्या उंबरठ्यावर आहेत. त्यांनी विस्कॉन्सिन आणि मिशिगनसारख्या महत्त्वाच्या राज्यांमध्ये विजय मिळवला आहे. विजयासाठी 270 इलेक्ट्रोल व्होट्सची गरज आहे. बायडेन यांना आतापर्यंत 264 इलेक्ट्रोल व्होट्स मिळाले आहेत.तर ट्रम्प यांना 214 इलेक्ट्रोल व्होट्स मिळाले आहेत.