बी.के.मॉडेल स्कूल येथे होणार मतमोजणी : 120 टेबल मतमोजणीसाठी सज्ज : पासशिवाय कोणालाच प्रवेश नाही
प्रतिनिधी/ बेळगाव
संपूर्ण जिह्याचे लक्ष लागून राहिलेल्या ग्राम पंचायत निवडणुकीच्या मतमोजणीची तयारी जिल्हा प्रशासनाने पूर्ण केली आहे. बेळगाव तालुक्मयाची मतमोजणी बी. के. मॉडेल स्कूल येथे होणार आहे. या मतमोजणीसाठी 120 टेबल तयार करण्यात आले आहेत. विभागवार मतमोजणी होणार आहे. प्रत्येक गावच्या मतमोजणीचा वॉर्ड क्रमांक सांगून त्या ठिकाणी मतमोजणी केली जाणार आहे. या मतमोजणीसाठी ज्यांच्याकडे पास आहे त्यांनाच प्रवेश देण्यात येणार आहे. याचबरोबर कोणत्याही प्रकारच्या कायद्याचे उल्लंघन केल्यास त्याच्यावर कठोर कारवाई करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
बी. के. मॉडेल स्कूल येथील वर्गखोल्यांमध्ये ही मतमोजणी होणार आहे. प्रवेश करताना प्रत्येकाची थर्मल स्क्रिनिंग करण्यात येणार आहे. त्या शिवाय कोणालाही आत प्रवेश देण्यात येणार नाही. मास्क प्रत्येकाने वापरणे सक्तीचे आहे. ज्या व्यक्ती मास्क आणणार नाहीत त्यांना माघारी पाठविण्यात येणार आहे. याचबरोबर सॅनिटायझरचाही वापर प्रत्येकाने करायचा आहे.
सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. त्या आधी एक तास उमेदवार व एजंटांनी हजर राहावे, असे कळविण्यात आले आहे. उमेदवार, एजंट व त्यांच्या समर्थकांच्या चार चाकी वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था सीपीएड मैदानावर करण्यात आली आहे. दुचाकी वाहन ग्लोब थिएटरच्या पाठीमागील दर्गा मैदानावर करण्यात आली आहे. अधिकाऱयांसाठी चंदन थिएटर येथे वाहनांच्या पार्किंगची सोय केली आहे. उमेदवार, एजंट व साऱयांनीच निवडणूक अधिकारी व कर्मचाऱयांना साहाय्य करावे. शांततेत मतमोजणी करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावेत, कोणीही कायद्याचे उल्लंघन करत असेल तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. ग्लोब थिएटरसमोरून जाणाऱया बी. के. मॉडेल स्कूल रस्त्यावर बॅरिकेड्स लावून तपासणी करूनच आत प्रवेश दिला जाणार आहे. दोन -तीन ठिकाणी त्यांची तपासणी करण्यात येणार आहे. त्यानंतरच प्रवेश देण्यात येणार आहे.