कुमार गंधर्व सभागृह-वनिता विद्यालयात अधिकारी-कर्मचाऱयांसाठी चाचणीची व्यवस्था
प्रतिनिधी / बेळगाव
लोकसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी दि. 2 मे रोजी होणार आहे. मतमोजणीवेळी कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे मतमोजणीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱयांसह पोलिंग एजंटनी कोरोना चाचणी करणे आवश्यक आहे. दक्षिण, उत्तर आणि ग्रामीण मतदारसंघांतील मतमोजणी करणाऱया 750 कर्मचाऱयांची व पोलिंग एजंटांची कोरोना चाचणी दि. 30 रोजी करण्याचा निर्णय आरोग्य खात्याने घेतला आहे.
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. त्यामुळे कोरोना नियमावलीचे पालन करत निवडणूक प्रक्रिया आणि मतमोजणी प्रक्रिया पूर्ण करण्याची सूचना राज्य निवडणूक आयोगाने अधिकाऱयांना केली आहे. सध्या दररोज हजारोंच्या संख्येने कोरोना रुग्णांची भर पडत आहे. दि. 2 मे रोजी मतमोजणी आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने विशेष सूचना केल्या आहेत. मतमोजणीवेळी उपस्थित राहणाऱया अधिकाऱयांसह पोलिंग एजंटांनी कोरोना चाचणी करणे बंधनकारक असून कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्र असलेल्यांनाच मतमोजणीसाठी केंद्रावर उपस्थित राहण्यास परवानगी देण्याची सूचना करण्यात आली आहे.
आरोग्य खात्याकडून सुविधा
मतमोजणीसाठी साडेसातशे कर्मचाऱयांची नियुक्ती करण्यात आली आहे. दक्षिण, उत्तर आणि ग्रामीण विधानसभा मतदार क्षेत्रातील मतमोजणीसाठी कर्मचाऱयांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे या सर्व कर्मचाऱयांसह पोलिंग एजंटांनी कोरोना चाचणी करून घेणे आवश्यक आहे. त्यामुळे सर्व कर्मचाऱयांची कोरोना चाचणी करण्याची सुविधा आरोग्य खात्याने केली आहे.
दि. 30 रोजी कुमार गंधर्व सभागृहाच्या आवारात दक्षिण आणि उत्तर मतदारसंघांतील मतमोजणी अधिकाऱयांची व कर्मचाऱयांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. वनिता विद्यालय येथे ग्रामीण मतदारसंघातील मतमोजणी करणाऱया अधिकारी व कर्मचाऱयांची कोरोना चाचणी करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्र उपलब्ध झाल्यानंतरच कर्मचाऱयांना मतमोजणीसाठी केंद्रावर जाता येणार आहे.
समर्थकांच्या जल्लोषावर मर्यादा
निवडणूक आयोगाच्या सूचनेमुळे मतमोजणी वेळी मतमोजणी केंद्रावर होणारी गर्दी कमी होण्याची शक्मयता आहे. सध्या क्लोजडाऊन असल्याने रहदारी बंद आहे. त्यामुळे मतमोजणी वेळी कार्यकर्त्यांची गर्दी ओसरण्याची शक्मयता आहे. कोरोना विषाणू प्रसारामुळे समर्थकांच्या जल्लोषावर पाणी फेरण्याची शक्मयता आहे.