प्रतिनिधी/ बेळगाव
विधान परिषदेसाठी 10 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. मतमोजणी बेळगावात करायची की चिकोडी येथे या विषयाचा संभ्रम दूर झाला असून याच काळात होणाऱया विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मतमोजणी चिकोडी येथे करण्यात येणार आहे.
या संबंधी जिल्हाधिकाऱयांनी एका आदेश जारी केला आहे. 14 डिसेंबर रोजी सकाळी 8 पासून चिकोडी येथील आर.डी. पीयु कॉलेजमध्ये मतमोजणी होणार आहे. यापूर्वी बेळगाव येथे मतमोजणीसाठी तयारी करण्यात आली होती. काही शिक्षण संस्थांना भेटी देवून इमारतींची पाहणी करण्यात आली होती.
13 ते 24 डिसेंबरपर्यंत विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुवर्ण विधानसौध येथे होणार आहे. त्यामुळे मतमोजणीचे ठिकाण चिकोडी येथे हलविण्यात आले असून या पार्श्वभूमीवर सर्व तयारी करण्यात येत आहे. विधान परिषदेच्या दोन जागांसाठी मतदान होणार आहे.
दरम्यान बेळगाव जिल्हय़ासाठी आर्थिक विभागाच्या सचिव डॉ. एकरुप कौर यांची निवडणूक निरीक्षक म्हणून सरकारने नियुक्ती केली असून निवडणुकीसंबंधी कोणत्याही प्रकारच्या तक्रारी असल्यास 8762349092 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन अप्परजिल्हाधिकाऱयांनी केले आहे.