किसान क्रेडिट कार्ड योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
प्रतिनिधी /बेळगाव
मासेमारी व्यवसायाला आर्थिक पाठबळ मिळवून देण्यासाठी मत्स्यपालनासाठी पिक कर्जाप्रमाणे कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. किसान पेडिट कार्ड योजनेद्वारे मासेमाऱयांना व्यवसायात आर्थिक प्रगती साधण्यासाठी कर्जाचा पुरवठा केला जाणार आहे. साधारण 1 लाख 60 हजार रुपयांपर्यंत कर्जपुरवठा केला जाणार आहे.
कोरोनामुळे मागील दोन वर्षात अनेक व्यवसाय अडचणीत आले आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रसरकारने किसान क्रेडिटकार्ड योजनेद्वारे पशुपालन, कुक्कूटपालन आणि मत्स्यपालन करणाऱयांना कर्जपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हय़ातील जलाशय आणि तलावांमध्ये मासेमारी करणाऱयांनी या कर्जाचा लाभ घेण्यासाठी अर्ज दाखल केले आहेत.
या कर्जाचा लाभ घेवून मासेमार तलावाची खोदाई, मत्स्यबीज खरेदी करणे, पाणी, विद्युत आणि इतर सुविधा उपलब्ध करून घेवू शकतात. व्यवसायाला बळकटी देण्यासाठी सवलतीच्या व्याजदरात कर्जाचा पुरवठा केला जाणार आहे. शेतीच्या धर्तीवरच मस्त्यपालनासाठी हा कर्जाचा पुरवठा होणार असल्याने माशांच्या उत्पादनात वाढ होणार आहे. संबंधित मत्स्यपालकांनी याचा लाभ घेण्यासाठी कणबर्गी रोड, रामतीर्थनगर येथील मत्स्य कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.