मालवण/प्रतिनिधी-
क्यार, महाचक्रीवादळामुळे पूर्ण क्षमतेने मासेमारी करू न शकलेल्या सागरी मच्छीमारांसाठी राज्य सरकारने ॲागस्ट २०२० मध्ये ६५ कोटी रुपयांचे आर्थिक पॕकेज जाहीर केले होते. या आर्थिक पॕकेजपासून वंचित राहिलेल्या रापण व्यावसायिक मच्छीमारांनी दांडी समुद्रकिनारी गुरूवारी सकाळपासून बेमुदत उपोषण आंदोलन सुरू केले आहे. कमलेश कोचरेकर रापण संघ आणि वाईरकर रापण संघाचे सदस्य यात सहभागी झाले आहेत. जोपर्यंत १९४ वंचित लाभार्थ्यांच्या खात्यात मत्स्य पॕकेजचे पैसे जमा होत नाहीत तोवर आंदोलन मागे घेणार नाही, असा पवित्रा मच्छीमारांनी घेतला आहे.