ऑनलाईन टीम / लखनऊ :
उत्तरप्रदेशातील मथुरा-अलीगढ मार्गावरील कोयल रेल्वे फाटकाजवळ भरधाव वेगातील कार धावत्या ट्रकमध्ये पाठीमागून घुसली. या भीषण अपघातात दोन तरुणींसह चार जण ठार झाले, तर तीन जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी जखमींना मथुरेच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. आज पहाटे हा अपघात झाला.
रोहित (वय 18), सिमरन (20), काजल (15) आणि मनीष अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. त्यांची पूर्ण नावे अद्याप समजू शकली नाहीत.
मिळालेल्या माहितीनुसार, कारमधील प्रवाशी बदायू जिल्ह्यातील रहिवाशी होते. हे सर्वजण रास्थानमधील मेहंदीपूर बालाजीला भेट देण्यासाठी निघाले होते.