वाहनधारकांमध्ये निर्माण होतयं भीतीचे वातावरण
प्रतिनिधी/ सातारा
मद्य प्राशन करून वाहन चालवणे हा गुन्हा आहे. तरीही काही चालक या नियमांचे उल्लघंन करतात. यांचे जिंवत उदाहरण सोमवारी रात्री राजपथावर अनुभवायला मिळाली. राजपथावर एका मद्यधुंद चालकाने एका दुचाकीसह चार चारचाकी वाहनांना धडक दिली. या अपघातात तीन जण जखमी झाले आहेत. तर मद्यधुंद कार चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असताना नववर्षाचे स्वागत करण्यासाठी सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. रात्रीची संचारबंदी ही लागू आहे. यामुळे यंदा नववर्षाचे स्वागत करताना नियमांचे भान ठेवणे गरजेचे झाले आहे. तरीही हे नियम न पाळणारे सध्या मद्यधुंद प्राशन करणारे आघाडीवर आहे. मद्य प्राशन करून दुचाकी-चारचाकी वाहने चालविण्यात येतात. यामुळे अपघात होवून प्रसंगी जीव जात आहे. अशीच घटना सोमवारी रात्री राजपथावर घडली. गौरव मधुकर कदम(वय 40) हे मद्य प्राशन करून रेनॉल्ड कंपनीची कार चालवत रात्री राजपथावरून निघाले होते. यावेळी त्यांनी एका दुचाकीसह चार चारचाकी वाहनांना धडक दिली. यामुळे राजपथ परिसरात एकाच गोंधळ उडाला. या अपघाताची माहिती मिळताच पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. आणि चालकांला ताब्यात घेतले. गौरव कदम यांच्या विरूद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस या अपघाताचा अधिक तपास करत आहेत.
पोलिसांनी वॉच वाढविणे गरजेचे
मद्यप्राशन करून दुचाकी-चारचाकी वाहने चालविणाऱया वाहनधारकांवर पोलिसांनी वॉच वाढविणे गरजेचे झाले आहे. संचारबंदीमुळे रात्री 8 नंतर मोठय़ा प्रमाणावर मद्यप्राशन करणारे लोक घराबाहेर पडत आहेत. शहरातील मुख्य चौकात पोलिसांनी यांचे चेकिंग करून योग्य ती करवाई केली पाहिजे. तरच अशा घटनांना आळा बसणार असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे.