आंध्रमधील हादरवून टाकणारी घटना : प्राण्याला पकडून ठेवणाऱयानेच गमावला जीव
वृत्तसंस्था / चित्तूर
आंध्रप्रदेशच्या चित्तूरमध्ये संक्रांतीवेळी एक हादरवून टाकणारी घटना घडली आहे. चित्तूरच्या वलसापल्लीमध्ये संक्राती पर्वावेळी पशुबळी दिला जात होता. यादरम्यान एका मद्यपी व्यक्तीने बकऱयाऐवजी माणसाचा गळा चिरला आहे. या आरोपीला अटक करण्यात आली आहे.
आरोपीचे नाव चेलापती आहे. गावात देवीकरता बळी दिला जात होतो. प्रथेनुसार चेलापतिला बकऱयाचे शिर धडावेगळे करायचे होते. परंतु यावेळी चेलापतिने मोठय़ा प्रमाणात मद्य प्राशन केले होते. बकऱयाऐवजी त्याने बकऱयाला धरून ठेवलेल्या सुरेश नावाच्या व्यक्तीच्या गळय़ावरच वार केला. जखमी सुरेशला रुग्णालयात हलविण्यात आले, परंतु त्याचा जीव वाचू शकलेला नाही.
मदनपल्ले गावात लोक दरवर्षी मंदिरात पशूबळी देतात. यंदाही संक्रांती सणादरम्यान बकऱयाचा बळी देण्यासाठी मोठय़ा संख्येत लोक पोहोचले होते. चलापतिला अटक करत पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.