जिल्हा सीईएनचे अधिकारीही घेणार ताब्यात
प्रतिनिधी/ बेळगाव
ईडीच्या नावे बँकांना नोटीसा पाठविल्याच्या आरोपावरुन येथील सीईएन विभागाने अटक केलेल्या युवकाची पोलीस कोठडीची मुदत शनिवारी संपली. त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले असून न्यायालयाच्या आदेशावरुन त्याची रवानगी हिंडलगा येथील मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे.
मधुकर विलास सापळे (वय 31, रा. दुसरा क्रॉस, शास्त्राrनगर) असे त्याचे नाव आहे. सीईएनचे पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर व त्यांच्या सहकाऱयांनी त्याला 10 मार्च रोजी अटक केली होती. ईडीच्या नावे वेगवेगळय़ा बँकांना नोटीसा पाठवून ग्राहकांची खाते गोठविण्याची सुचना देण्याबरोबरच इन्शुरन्सच्या नावेही त्याने अनेकांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले होते.
या प्रकरणाच्या चौकशीसाठी त्याला न्यायालयाची परवानगी घेवून 10 दिवसांसाठी पोलीस कोठडीत घेण्यात आले होते. शनिवारी कोठडीची मुदत संपली. त्यामुळे दुपारी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणी करुन त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाच्या आदेशावरुन त्याची रवानगी हिंडलगा येथील मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली.
जिल्हा सीईएन विभागातही मधुकर सापळेवर एफआयआर दाखल झाले आहेत. या प्रकरणांच्या चौकशीसाठी त्याला पोलीस कोठडीत घेण्याची तयारी अधिकाऱयांनी केली आहे. गेल्या दहा दिवसांत त्याची कसुन चौकशी करुन त्याच्या जवळून महत्वाची कागदपत्रे, बनावट शिक्के आदी जप्त करण्यात आले आहेत.