बॉलिवूड अभिनेती क्रीति सेनॉन सध्या ‘मिमी’ या चित्रपटाच्या यशाचा आनंद घेत आहे. क्रीतिने आता बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेत्रीच्या बायोपिकमध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मधुबाला यांच्या बायोपिकमध्ये काम करण्याची माझी इच्छा आहे. आमच्या चित्रपटसृष्टीत काही उत्तुंग व्यक्तिमत्त्वे राहिली आहेत. त्यांच्या जीवनाविषयी लोक फारसे जाणत नसल्याचे क्रीति म्हणाली.
मधुबाला यांच्यासह मीना कुमारी यांच्या बायोपिकमध्ये त्यांची व्यक्तिरेखा साकारणे मी पसंत करेन. दोघेही त्यांच्य काळात उत्तम कलाकार राहिल्या होत्या. वैयक्तिक स्वरुपात त्यांच्याविषयी जाणून घेणे मला आवडेल असे क्रीतिने म्हटले आहे.
दिवंगत अभिनेत्रीची बहिण मधुबाला यांच्या जीवनावर चित्रपट साकारण्यास इच्छुक आहे. दिग्दर्शक तिग्मांशू धूलिया हे मीना कुमारी यांच्यावर बेतलेला चित्रपट तयार करू इच्छित होते आणि यात विद्या बालन त्यांची भूमिका साकारणार होती. पण मीना कुमारी यांच्या जीवनावर आता एक वेबसीरिज तयार करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे समजते.
क्रीतिने 60 च्या दशकातील दिग्गज अभिनेत्रींची व्यक्तिरेखा साकारण्याची इच्छा व्यक्त केली आहे. क्रीति लवकरच प्रभाससोबत ‘आदिपुरुष’ चित्रपटात दिसून येणार आहे. याचबरोबर टायगर श्रॉफसोबत ‘गणपत’, अक्षय कुमारसोबत ‘बच्चन पांडे’ आणि वरुण धवन सोबत ‘भेडिया’ या चित्रपटातून ती झळकणार आहे.