वाळपई विभागीय कृषी कार्यालयाचा निर्धार
वाळपई / प्रतिनिधी
सत्तरी तालुक्मयातील नैसर्गिक वातावरण हे मधुमक्षिका पालन करण्यासाठी प्रोत्साहित करणारे आहे .यामुळे येणाऱया काळात सत्तरी तालुक्मयात मधुमक्षिकापालन व्यवसायाचा विस्तार करण्याचा निर्धार वाळपई विभागीय कृषी कार्यालयाने केलेला आहे.या संदर्भाच्या एक महत्त्वाची कार्यशाळा.कोपार्डे याठिकाणी संपन्न झाली. यामध्ये मधुमक्षिका पालन करणाऱया शेतकऱयांची खास उपस्थिती होती .यावेळी त्यांना मेलविन यानी मधुमक्षिका पालन करण्यासंदर्भात येणारी काळजी व एकूण व्यवसाय संदर्भात सविस्तरपणे माहिती दिली. त्याचबरोबर त्यांनी मधुमक्षिका पालन पेटीचे कशाप्रकारे नियोजन करावे या संदर्भात उपयुक्त माहिती दिली. याप्रसंगी उपविभागीय कृषी कार्यालयाचे कृषी अधिकारी विश्वनाथ गावस सहाय्यक अधिकारी रणजीत म्हापसेकर व इतरांची खास उपस्थिती होती. आत्मा योजना अंतर्गत या कार्यक्रमाचे खास आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी बोलताना कृषी अधिकारी विश्वनाथ गावस यांनी सांगितले की सत्तरी तालुक्मयात आतापर्यंत 50 जणांना मधुमक्षिका पालन करण्याचे पेटा वितरित करण्यात आलेले आहे. गेल्या एक वर्षात जवळपास 30 किलो मध निर्मिती झालेली आहे .यामुळे येणाऱया काळात सत्तरी तालुक्मयात यासंदर्भात याव्यवसायाला चांगल्या प्रकारची संधी असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
आत्मा योजनेअंतर्गत शेतकऱयांना वेगवेगळय़ा स्वरूपात प्रोत्साहन देण्याच्या दृष्टिकोनातून कृषी खात्यातर्फे प्रयत्न करण्यात येत आहे. त्याला चांगला प्रतिसाद लाभत आहे. इतर व्यवसाया बरोबरच मधुमक्षिकापालन याला चांगल्या प्रकारचा वाव आहे. यामुळे शेतकऱयांनी यासंदर्भात रस दाखवावा अशा प्रकारचे आवाहन केले. मधुमक्षिका पालन करण्यासंदर्भात समोरील येणाऱया अडचणी या संदर्भात उपाययोजना व निर्माण होणाऱया समस्या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी अशा प्रकारच्या कार्यशाळेचे वारंवारपणे आयोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
त्याचप्रमाणे कर्नाटक व महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचा मोठा व्यवसाय उभारण्यात आलेला आहे. त्यात संदर्भाची अभ्यास सहल आयोजित करण्यावर भर देण्याचे आश्वासन यावेळी त्यांनी दिले.
याकार्यशाळेला विशेष मार्गदर्शन करण्यासाठी खास उपस्थित असलेले मेलविन यांनी मधुमक्षिका पालन करताना घ्यावयाची काळजी या संदर्भात सुंदर मार्गदर्शन केले. गोवा महाराष्ट्र व कर्नाटका या राज्यांमध्ये वेगवेगळय़ा प्रकारे मधुमक्षिकापालन करण्याचे तंत्र विकसित झालेले आहे. मात्र गोव्यामध्ये कशाप्रकारे व कोणत्या प्रकाराचे मधुमक्षिका पालन केल्यास त्याचा चांगल्या प्रकारे फायदा होणार यासंदर्भात सविस्तरपणे माहिती दिली. सत्तरी तालुक्मयात आतापर्यंत मधुमक्षिका पालन करण्यासंदर्भात केलेल्या प्रयत्नांना बऱयाच प्रमाणात यश आले असलेतरी सुद्धा काहीजणांना अनेक प्रकारच्या अडचणी निर्माण झालेले आहेत. त्या संदर्भात खात्यातर्फे मदत करण्याच्या दृष्टीकोनातून प्रयत्न सुरू असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी सहाय्यक कृषी अधिकारी रणजित मापसेकर यांनीही यावेळी आपले विचार मांडले. त्यानंतर झालेल्या चर्चेत मिलिंद गाडगीळ उदय सावंत सोमनाथ गावास व इतरांनी सविस्तरपणे भाग घेतला. यावेळी मिलिंद गाडगीळ यांनी मधुमक्षिका पालन करतांना आलेल्या अनेक प्रकारच्या अडचणी उपस्थितांसमोर मांडल्या व त्या सोडविण्याच्या दृष्टिकोनातून आत्मा योजना व कृषी खात्याने विशेष प्रयत्न करण्याचे आवाहन केले. उदय सावंत यांनी यावेळी ज्याशेतकऱयांना मधुमक्षिका पालन करण्यासाठी पेटय़ा दिलेल्या आहेत त्यातील मुंग्या पळून गेलेल्या असून त्यामुळे त्यांना नुकसान झालेले आहे. त्यामुळे कृषी खात्याने याशेतकऱयांना अशा पेटय़ा मोफत उपलब्ध करून देण्याची मागणी केली. त्याचप्रमाणे सत्तरी तालुक्मयात चांगल्या प्रकारे मधुमक्षिका पालन करण्याची संधी असली तरीसुद्धा कृषी खात्याने प्रात्यक्षिक प्रकल्प उभारण्याची मागणी केली.भिवा गावस यानीही यावेळी चर्चेत भाग घेतला.