क्रीडा प्रतिनिधी /मडगाव
आपल्या मागील दोन सामन्यात सलग दोन विजय नोंदविलेल्या गोव्याला काल व्हीजेडी पद्धतीवर मध्यप्रदेशकडून 45 धावानी पराभव स्वीकारावा लागला. काल हा सामना विझागच्या कोंडूकुरी क्रिकेट अकादमीच्या मैदानावर खेळविण्यात आला. मध्यप्रदेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारल्यानंतर आपल्या डावात निर्धारीत 50 षटकात 8 बाद 209 धावा केल्या. मध्यप्रदेशसाठी पूजा वस्त्रकरने 84 धावांची निर्दोष खेळी केली.
गोव्याने 33 षटकात 4 बाद 90 धावपर्यंत मारली. प्रथम 31 षटकानंतर पावसामुळे खेळ थांबविण्यात आला. त्यानंतर पाऊस संपल्यानंतर आणखी दोन षटकांचा खेळ झाला. सामना संपविण्यात आला तेव्हा व्हीजेडी पद्धतीवर मध्यप्रदेशला 45 धावानी विजयी घोषित करण्यात आले. आज गुरूवारी गोव्याचा सामना गुजरातशी होईल. संक्षिप्त धावफलकः मध्यप्रदेश, 50 षटकात 8 बाद 209 (नेहा बाडवईक 39, आश्ना पटिदार 10, पूजा वस्त्रकर 84 (99 चेंडू, 8ƒ4, 1ƒ6), प्रीती यादव 17, सलोनी डांगोरे 19, निकिता सिंग 18, वर्षा 10 धावा. शिखा पांडे 10-0-43-0, निकिता मळीक 5-0-15-0, सुनंदा येत्रेकर 10-1-38-1, रुपाली चव्हाण 10-1-32-1, सोनाली गवंडर 4-0-15-0, पूर्वा भाईडकर 7-0-35-1, तेजस्विनी दुर्गद 4-0-29-1) विजयी विरूद्ध गोवा व्हीजेडी पद्धतीने, 33 षटकात 4 बाद 90 (पूर्वजा वेर्लेकर 26, श्रेया परब 22, तेजस्विनी दुर्गद 9, शिखा पांडे 0, सुनंदा येत्रेकर नाबाद 15, संजुला नाईक नाबाद 10 धावा. पूनम सोनी 7-2-16-1, प्रिती यादव 6-1-16-1, सलोनी डांगोरे 5-1-16-1).